Lalit Patil | ललित पाटील याची महिन्याची कमाई किती? तपासातून धक्कादायक माहिती

Pune lalit patil drug case | पुणे येथील ससून रुग्णालयातून फरार झालेला कैदी ललित पाटील याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या कस्टीडीत असलेल्या ललित पाटील याची कसून चौकशी होत आहे. तपासातून धक्कादायक माहिती समोर आलीय.

Lalit Patil | ललित पाटील याची महिन्याची कमाई किती? तपासातून धक्कादायक माहिती
Lalit Patil
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 12:51 PM

पुणे | 20 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील येरवडा कारागृहात ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेल्या ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. २ ऑक्टोंबर रोजी ललित पाटील फरार झाल्यानंतर पंधरा दिवस तो सापडला नाही. अखेर १८ ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांनी त्याला कर्नाटकातून अटक केली. त्यानंतर ललित पाटील याने आपण पळला नाही तर आपणास पळवले गेले होते, असा दावा केला. आपणास पळवणाऱ्यांची नावे सांगणार असल्याचे त्याने म्हटले. मुंबई पोलिसांच्या कस्टडीत असलेल्या ललित पाटील याची कसून चौकशी होत आहे. यावेळी अनेक धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

कधीपासून होता ललित पाटील यांचा उद्योग

आरोपी ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील याने ड्रग्सचा उद्योग उभारला. ललित पाटील हा नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी आहे. त्यावने शिंदे गावात एका बंद कारखान्यात ड्रग्सचे उत्पादन सुरु केले. २०२१ सालापासून तो एमडी ड्रग्जचे उत्पादन करत होता. केमिकल इंजिनिअर असलेल्या भूषण पाटील ड्रग्स तयार करत होता तर ललित पाटील विक्री करत होता. राज्यांतील अनेक भागांत ललित पाटील ड्रग्ज पोहचवत होता. त्याने राज्यात सर्वत्र ड्रग्स तस्करीचे जाळे तयार केले होते.

किती होते ललित पाटील याचे उत्पन्न

ललित पाटील याला अटक झाल्यानंतर तो पुणे येथील येरवडा कारागृहात होता. जून महिन्यापासून तो ससून रुग्णालयात उपचार घेत होता. त्याचे हे उपचार नावालाच होते. त्यामार्फत ससून रुग्णायलयात त्याची चांगलीच बडदास्त ठेवली जात होती. ससूनमध्ये सिगरेट ओढताना आणि हॉटेलमध्ये मैत्रिणासोबतचे त्याचे फोटो व्हायरल झाले आहे. ड्रग्सच्या काळ्या धंद्यातून महिन्याकाठी त्याची ५० लाख रुपयांची कमाई होत असल्याची माहिती तपासातून बाहेर आली आहे.

हे सुद्धा वाचा

भूषण पाटील मुंबई पोलीस घेणार कस्टडीत

ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. पुणे पोलीस दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करणार आहे. यावेळी मुंबई पोलीस दोघांचा ताबा मागणार आहे. मुंबई पोलिसांकडून न्यायालयात प्रोडक्शन वॉरंट दाखल करण्यात आले आहे.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.