झोपमोड केल्यामुळे चक्क भाडेकरुकडून घरमालकाची हत्या

Pune Crime News | पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढत आहे. किरकोळ कारणावरुन हत्या होत आहे. कधी गोळीबार केला जात आहे. कधी भर रस्त्यावर कोयता काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता झोपमोड केल्यामुळे भाडेकरुने घरमालकाची हत्या केल्याचा प्रकार घडाला आहे.

झोपमोड केल्यामुळे चक्क भाडेकरुकडून घरमालकाची हत्या
Follow us
| Updated on: Nov 23, 2023 | 12:54 PM

योगेश बोरेसे, पुणे, दि. 23 नोव्हेंबर | पुरेशी झोप ही शरीराची गरज आहे. अनेकवेळा काही करणांमुळे झोप होत नाही. एखाद्याने झोपमोड केली तरी राग येतो. परंतु हा संताप एखाद्याची हत्या करण्यापर्यंत जाईल का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी असणार आहे. पुणे शहरात मात्र झोपमोड केल्यामुळे भाडेकरुने चक्क घरमालकाची हत्या केली. या प्रकारामुळे पुण्यात खळबळ माजली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी संतोष राजेंद्र धोत्रे याला अटक केली आहे. घरासमोर दुचाकीचा जोरजोराने हॉर्न वाजवल्याचा राग संतोष धोत्रे यांना आला. त्यानंतर त्यांनी घरमालक दादा ज्ञानदेव घुले यांची हत्या केल्याचा प्रकार उघड झाला. पुण्यातील हडपसर रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात ही घटना घडली.

काय आहे नेमका प्रकार

दादा ज्ञानदेव घुले यांच्या घरात संतोष राजेंद्र धोत्रे राहतात. सोमवारी दुपारी संतोष धोत्रे दारू पिल्यानंतर घरात झोपायला गेला. त्यावेळी दादा ज्ञानदेव घुले यांनी त्यांच्या घरासमोर दुचाकीचा हॉर्न जोरजोराने वाजवला. त्याचा संताप धोत्रे यांना आला. आपली झोपमोड केल्यामुळे धोत्रे यांने दादा घुले यांना शिविगाळ आणि मारहाण सुरु केली. त्यानंतर पार्किंगमधील पाण्याच्या टाकीत घुले यांना बुडवून त्यांचा खून केला. या प्रकारामुळे पुण्यात चाललंय काय? हा प्रश्न उपस्थित होते आहे. कारण रस्त्यावर कोतया चालवण्याचे प्रकार सतत पुण्यात घडत आहे. दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरुन एकाने दुसऱ्यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती.

हे सुद्धा वाचा

असा लागला तपास

दादा घुले रात्री उशिरापर्यंत घरी आले नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी ते बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार दिली. चौकशीदरम्यान घुले आणि धोत्रे यांच्यात सोमवारी भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घरासमोर दुचाकीचे जोरात हॉर्न वाजवून झोपमोड केल्यामुळे भाडेकरु असलेल्या धोत्रे यांनी थेट घरमालक घोले यांची हत्या केल्याचे उघड झाले. पाण्याच्या टाकीत बुडवून हा खून केल्याचे त्याने पोलीस चौकशीत सांगितले. पोलिसांनी संतोष राजेंद्र धोत्रे याला अटक केली. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

Non Stop LIVE Update
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं UNCUT भाषण; विरोधकांचा घेतला समाचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं UNCUT भाषण; विरोधकांचा घेतला समाचार.
जय शाहाला बॉलिंग, बॅटिंग तरी येते का? 'त्या' टीकेवरून कुणाचा हल्लाबोल
जय शाहाला बॉलिंग, बॅटिंग तरी येते का? 'त्या' टीकेवरून कुणाचा हल्लाबोल.
ठाकरे की शिंदे धक्का कुणाला? हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात?कुणाचा दावा
ठाकरे की शिंदे धक्का कुणाला? हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात?कुणाचा दावा.
राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा
राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा.
फडणवीसांवर केलेल्या जरांगेंच्या टिकेनंतर भाजपनं छापली पानभर जाहिरात
फडणवीसांवर केलेल्या जरांगेंच्या टिकेनंतर भाजपनं छापली पानभर जाहिरात.
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर.
बापरे... अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच
बापरे... अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच.
ST स्टँड आहे की एअरपोर्ट....अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?
ST स्टँड आहे की एअरपोर्ट....अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?.
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात.
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी.