वानखेडेंविरोधात एनसीबीच्याच एका अधिकाऱ्याचं निनावी पत्रं, 26 प्रकरणं दिली, चौकशी व्हावी; नवाब मलिक यांची मागणी

| Updated on: Oct 26, 2021 | 10:42 AM

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे. एनसीबीच्याच एका अधिकाऱ्याने पत्रं दिलं आहे. (Nawab Malik receives letter from unnamed NCB official)

वानखेडेंविरोधात एनसीबीच्याच एका अधिकाऱ्याचं निनावी पत्रं, 26 प्रकरणं दिली, चौकशी व्हावी; नवाब मलिक यांची मागणी
Nawab Malik
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे. एनसीबीच्याच एका अधिकाऱ्याने पत्रं दिलं आहे. त्यात समीर वानखेडेंच्या एकूण 26 फ्रॉड केसेसचा उल्लेख आहे, असा दावा करतानाच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन हा बॉम्बगोळा टाकला आहे. मला एक पत्रं मिळालं आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्याने हे पत्रं पाठवलं. दोन दिवसांपूर्वीच मिळालं. त्याची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि डीजी, काँग्रेसच्या अध्यक्षांनाही ही प्रत त्या व्यक्तीने दिले आहे. एनसीबीने चौकशी सुरू केली आहे. त्यांना हे पत्रं पाठवणार. त्यात 26 केसेसची माहिती दिली आहे. त्याचीही चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहोत. एनसीबीच्या कार्यालयात एक ग्रुप तयार झाला आहे. खोटी प्रकरणं तयार केली जात आहेत. प्रामाणिक अधिकाऱ्यांना डावललं जात आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास अनेक माहिती उघड आहे. एनसीबीच्या अंतर्गत हा मामला आहे. ते चौकशी करतील, असं मलिक यांनी म्हटलं आहे.

एनसीबीशी लढाई नाही

आमची लढाई एनसीबीशी नाही. गेल्या 35 वर्षात एनसबीने देशात चांगलं काम केलं आहे. कधीही या संस्थेवर कोणी प्रश्नचिन्हं उपस्थित केलं नाही. पण एक व्यक्ती फर्जीवाडा करून सरकारी नोकरीत येतो. त्याचा खुलासा मी केला आहे. पती, पत्नी आणि वडिलांना या प्रकरणात घेतलं जात असल्याचं सांगितलं जातं. पण आम्ही कोणतीही चुकीची गोष्ट किंवा अभद्र गोष्ट केली नाही. मी फक्त जन्म दाखला पोस्ट केला. मी हिंदू मुस्लिम हा मुद्दा कधीच केला नाही. भाजपने उलट त्याला धार्मिक रंग दिला. मी 45 वर्ष राजकारणात आहे. पण धर्माच्या नावावर राजकारण केलं नाही, असं मलिक म्हणाले.

वानखेडेंच सर्टिफिकेट नेटवर नाही

इंटरनेटवर सर्वांचं बर्थ सर्टिफिकेट मिळतं. वानखेडेच्या बहिणीचं सर्टिफिकेट इंटरनेटवर आहे. पण समीर वानखेडेचं सर्टिफिकेट नाही. आम्ही खूप शोधल्यानंतर आम्हाला हे सर्टिफिकेट मिळालं. ज्ञानेश्वर वानखेडे जन्माने दलित आहेत. त्यांनी दलित असल्याचं सर्टिफिकेट घेतलं. नोकरी मिळवली. त्यानंतर त्यांनी लग्न केलं आणि धर्मांतर केलं. त्यानंतर ते आयुष्यभर मुस्लिम म्हणून जगले. त्यानंतर समीर वानखेडेंनी वडिलांच्या सर्टिफिकेटचा आधार घेऊन सर्टिफिकेट घेतलं, असा दावा मलिक यांनी केला आहे.

दलित संघटनांशी चर्चा

आम्ही या प्रकरणी दलित संघटना आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहोत. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे सर्टिफिकेट बनवून नोकऱ्या मिळवल्या गेल्या. त्याच्या या पूर्वी तक्रारी आल्या. त्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी जात पडताळणी समिती स्थापन करण्यात आली. पण केंद्राकडे अशी कमिटी नाही. केवळ जिल्हाधिकाऱ्याकडून प्रमाणपत्रं मिळवलं जातं. आता या व्हॅलिडेशन कमिटी समोर हे सर्टिफिकेट तपासण्याची मागणी करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

समीर वानखेडेंचं सर्टिफिकेट जात पडताळणी समितीला पडताळणीसाठी देणार, मलिक म्हणतात, दूध का दूध पानी का पानी होणार

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी?, राऊतांचा ‘रोखठोक सामना’

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानच्या वतीने रोहतगी बाजू मांडणार, जामीन अर्जावर बॉम्बे हायकोर्टात सुनावणी

(Nawab Malik receives letter from unnamed NCB official)