बिहार निवडणुकीसाठी महाराष्ट्राची बदनामी का?, सुशांतसिंहचा हत्यारा कोण?; राष्ट्रवादीचा सवाल

| Updated on: Jun 14, 2021 | 12:06 PM

अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput Suicide) याच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झालं आहे. अजूनही सुशांतसिंहच्या मृत्यूचं गूढ उलगडलं नाहीये. त्यावरून राष्ट्रवादीने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

बिहार निवडणुकीसाठी महाराष्ट्राची बदनामी का?, सुशांतसिंहचा हत्यारा कोण?; राष्ट्रवादीचा सवाल
नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झालं आहे. अजूनही सुशांतसिंहच्या मृत्यूचं गूढ उलगडलं नाहीये. त्यावरून राष्ट्रवादीने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपला बिहार निवडणूक लढवायची होती. त्यामुळे सीबीआयला पुढे करून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. (nawab malik slams bjp over sushant singh rajput suicide case)

सुशांतसिंहच्या आत्महत्येला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असतानाच राजकीय कारणामुळे या प्रकरणाचा गुन्हा बिहार सरकारने दाखल केला. त्यानंतर ही केस सीबीआयकडे दिली होती. परंतु, निष्पन्न काय झालं?, असा सवालही मलिक यांनी केला आहे. एक वर्षानंतर सुशांतसिंहच्या आत्महत्येचा तपास झालेला नाही. त्यामुळे त्याची आत्महत्या नव्हती तर त्याचा हत्यारा कोण हे सीबीआयने जनतेला सांगितले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

विविध कार्यक्रमांचं आयोजन

दरम्यान, आज सुशांतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे सुशांतच्या स्मृतीप्रित्यर्थ सांताक्रुझच्या वाकोला येथील नजमा हेपतुल्ला हॉलमध्ये गरजूंना ट्राय सायकल, विकलांगांना आवश्यक साहित्य, शिलाई मशीन्स आणि रेशन सामानांचं वाटप केलं जात आहे. देभरात सुशांतच्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच सुशांतला न्याय देण्याची मागणीही सोशल मीडियावरून करण्यात येत आहे.

वर्षभरापूर्वी आत्महत्या

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून 2020 रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली केली होती. मात्र, सुशांत (Sushant Singh Rajput) आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या करण्यात आली आहे, असा दावा त्याच्या कुटुंबाने केला होता. सुशांतच्या चाहत्यांनीही त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत, त्याला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर अनेक मोहिमा राबवल्या होत्या. यानंतर सुशांत आत्महत्या प्रकरण, हत्येच्या संशयामुळे सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. मात्र सुशांतने आत्महत्या केल्याचं तपासात उघड झालं होतं.

सुशांतच्या घरातील 8 हार्ड डिस्क नष्ट?

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि त्याची गर्लफ्रेंड- अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यामध्ये 8 जून 2020ला कडाक्याचे भांडण झाले होते, त्यानंतर आयटी प्रोफेशनलला बोलावून सुशांतच्या घरातील 8 हार्ड डिस्क नष्ट करण्यात आली, अशी माहिती सीबीआयने केलेल्या सिद्धार्थ पिठाणीच्या चौकशीत समोर आली होती. हार्ड डिस्कमध्ये सुशांत आणि रियाच्या कुटुंबाच्या परदेश दौऱ्याचे फोटो यामध्ये असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आला होता. तसेच दोघांच्या कंपन्यांचे महत्त्वाचे कागदपत्रही हार्ड डिस्कमध्ये होते, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. (nawab malik slams bjp over sushant singh rajput suicide case)

 

संबंधित बातम्या:

भारताचे महान धावपट्टू मिल्खा सिंग यांच्या पत्नी कालवश, कोरोना संक्रमनामुळे निधन

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात सर्वात मोठी कारवाई, रुममेट सिद्धार्थ पिठाणीला अटक

सिद्धार्थ पिठाणीची अटक रियाला देखील अडचणीत आणणार? अडचणी आणखी वाढण्याची शक्यता!

(nawab malik slams bjp over sushant singh rajput suicide case)