पेट्रोलपंपावरील मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादी रविवारी राज्यभर चूल मांडणार

| Updated on: Feb 28, 2021 | 12:06 AM

मोदींची जाहिरात असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक पेट्रोलपंपावर हे आंदोलन केले जाणार आहे. (NCP Agitation against Petrol-Diesel Gas Price Increasing)  

पेट्रोलपंपावरील मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादी रविवारी राज्यभर चूल मांडणार
Petrol-Diesel Price Today
Follow us on

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. देशातल्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलची (Petrol-Diesel Price Today) किंमत 100 रुपयांच्या पार गेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने उद्या चूल मांडा आंदोलन केले जाणार आहे. सामान्य जनतेच्या भावनांच्या उद्रेकाला वाट मिळवून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. मोदींची जाहिरात असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक पेट्रोलपंपावर हे आंदोलन केले जाणार आहे. (NCP Agitation against Petrol-Diesel Gas Price Increasing)

दिवसेंदिवस गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे भाव गगनाला भिडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रत्येक पेट्रोलपंपावरील जाहिरात ही सामान्यांना अच्छे दिनचा खोटा आशावाद देत आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.

ज्या पेट्रोल पंपावर मोदींचा बॅनर किंवा जाहिरात झळकत आहे. त्या बॅनर किंवा फलकाखाली दगडांची किंवा विटांची चूल ठेवली जाईल. तसेच गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीच्या निषेधही यावेळी करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी आता ही दगडाची आणि विटाची चूल पेटवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. याचा प्रतिकात्मक निषेध यातून करण्यात येईल असेही रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.

या आंदोलनात महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर या पुण्यातून सहभागी होणार आहेत. तरी या आंदोलनात अधिकाधिक महिला कार्यकर्त्या आणि सर्वसामान्य गृहिणींनी सोशल डिस्टन्ससिंगचे नियम पाळून सहभागी होणार आहेत, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे. (NCP Agitation against Petrol-Diesel Gas Price Increasing)

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 91.17 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.47 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.35 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 93.12 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Petrol Price Today) : 89.38 रुपये प्रतिलिटर

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (NCP Agitation against Petrol-Diesel Gas Price Increasing)

संबंधित बातम्या : 

Petrol-Diesel Price Today | तीन दिवसांनंतर पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

आता पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त होणार; पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी सांगितले ‘कारण’