सुप्रीम कोर्टाच्या महानिकालानंतर शरद पवार यांनी ‘या’ व्यक्तीवर ठेवलं बोट, ओढले ताशेरे

| Updated on: May 11, 2023 | 4:44 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एका व्यक्तीवर ताशेरे ओढले. संबंधित व्यक्तीने राज्याच्या सत्ता परिवर्तनाच्या काळात महत्त्वाची भूमिका होती. या व्यक्तीबद्दल शरद पवार यांनी तिखट शब्दांत भूमिका मांडली.

सुप्रीम कोर्टाच्या महानिकालानंतर शरद पवार यांनी या व्यक्तीवर ठेवलं बोट, ओढले ताशेरे
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबद्दल सुप्रीम कोर्टाचा निकाल आज जाहीर झालाय. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. सुप्रीम कोर्टाने आज निकालात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नको होता. नाहीतर सरकार पुन्हा आणलं असतं, असं स्पष्ट म्हटलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरं न जाता राजीनाम्याचा घेतलेला निर्णय कायदेशीरपणे चुकीचा ठरला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मित्रपक्षांनी त्यांना बहुमत चाचणीला सामोरं जाण्याचं आवाहन केलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. सु्प्रीम कोर्टाने याबाबत आज निकाल जाहीर केल्यानंतर शरद पवार यांची भूमिका समोर आली आहे. यावेळी शरद पवार यांनी एका व्यक्तीच्या कृतीवर बोट ठेवलं.

सुप्रीम कोर्टाने आज राज्यपालांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. “राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावायला नको होती. कारण राज्यपालांकडे त्यावेळी बहुमत चाचणीसाठी पुरसे कारणे नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून पाठिंबा काढला असं कोणत्याही पत्रात म्हटलं नव्हतं”, असं कोर्टाने म्हटलं. त्यावरुन शरद पवार यांनी राज्यपालांच्या कृतीवर बोट ठेवलं. “राज्यरालांची निवड किती चुकीची केली जाते याचं उत्तम उदाहारण महाराष्ट्राने पाहिलं आहे. मला वाटतं मी जाहीरपणे याबाबत याआधीदेखील बोललेलो आहे”, असं म्हणत शरद पवार यांनी राज्यपालांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

‘सत्तेचा गैरवापर केला जातोय’

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर आता चर्चा करण्यात अर्थ नाही, असंही शरद पवार स्पष्ट म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना आलेल्या ईडीच्या नोटीस विषयी देखील शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “जयंत पाटील आणि आणखी काही जणांना नोटीस आली आहे. सत्तेचा गैरवापर केला जातोय. आम्ही त्याच्याविरोधात लढू”, असं शरद पवार म्हणाले.

‘मी स्पष्ट लिहिल्यामुळे नाराजी, पण आज…’

“हल्लीच माझं एक पुस्तक प्रकाशित झालंय. त्यात हा विषय आहे. त्यात मी स्पष्ट लिहिलं आहे, मी स्पष्ट लिहिल्यामुळे आमच्या मित्रपक्षात नाराजी झाली. पण माझा नाराज करण्याचा हेतू नव्हता. ती वस्तुस्थिती होती. सुप्रीम कोर्टाने ती स्पष्ट केली आहे. ठिक आहे जे झालं ते झालं. आम्ही उद्धव ठाकरे, काँग्रेस मिळून जोमाने काम करायला सुरुवात करु”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.