जितेंद्र आव्हाड यांची ‘कोरोना’शी यशस्वी झुंज, डॉक्टर्स, नर्सेसचा आयुष्यभर ऋणी, ट्विटरवरुन आभार

| Updated on: May 10, 2020 | 12:30 PM

मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन, त्यांना मनापासून धन्यवाद" अशा शब्दात आव्हाडांनी आभार व्यक्त केले (NCP Minister Jitendra Awhad Corona Free Gets Discharged)

जितेंद्र आव्हाड यांची कोरोनाशी यशस्वी झुंज, डॉक्टर्स, नर्सेसचा आयुष्यभर ऋणी, ट्विटरवरुन आभार
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि ठाकरे सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘कोरोना’शी यशस्वी झुंज दिली आहे. आव्हाडांनी आपल्या प्रकृतीविषयी ट्विटरवरुन माहिती देत उपचार करणारे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय यांचे आभार व्यक्त केले आहेत. (NCP Minister Jitendra Awhad Corona Free Gets Discharged)

“गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरुप घरी जात आहे. यापुढेही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच राहू द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया” असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

“माझ्यावर यशस्वी उपचार करणारे मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन, त्यांना मनापासून धन्यवाद” अशा शब्दात आव्हाडांनी आभार व्यक्त केले आहेत. ‘सर्वात महत्वाचं म्हणजे माझी पत्नी आणि मुलगी यांच्या प्रेमाची ताकद माझ्या पाठीशी होती.’ असं म्हणत त्यांनी कुटुंबियांचेही ऋण मानले.

हेही वाचा : महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्याला कोरोनाची लागणमाजी खासदार-माजी नगरसेवकालाही संसर्ग

“महिन्याभरानंतर मी आपल्या सर्वांमध्ये आणि सर्वांसाठी पुन्हा असेन” असं सांगतानाच जितेंद्र आव्हाड यांनी कवितेच्या काही ओळी ट्वीट केल्या आहेत.

अपने कदमों के काबिलियत पर
विश्वास करता हूं ,
कितनी बार तूटा लेकीन
अपनो के लिये जीता हूं ,

चलता रहूंगा पथपर
चलने मैं माहीर बन जाऊंगा
या तो मंजिल मिल जायेगी
या अच्छा मुशाफिर बन जाऊंगा.

‘कोरोना’ग्रस्त पोलिसाशी संपर्कात आल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी 12 एप्रिलला ‘सेल्फ क्वारंटाइन’ होण्याचा पर्याय स्वीकारला होता. त्यानंतर काही दिवसांनी ‘कोरोना’ची लागण झाल्याचं आव्हाड यांना समजलं होतं. (NCP Minister Jitendra Awhad Corona Free Gets Discharged)