“हे बजेट म्हणजे खोदा पहाड निकला चूहा”; राष्ट्रवादीच्या नेत्यानं मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचं विश्लेषण केलं

| Updated on: Feb 01, 2023 | 9:12 PM

भाजपने ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याची घोषणा केली होती. याच पद्धतीच्या मोठमोठ्या घोषणा भारतीय जनता पक्षाकडून केल्या जातात. 2014 पासूनही अशाच पद्धतीच्या घोषणा करण्यात आल्या होत्या.

हे बजेट म्हणजे खोदा पहाड निकला चूहा; राष्ट्रवादीच्या नेत्यानं मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचं विश्लेषण केलं
Follow us on

मुंबईः मोदी सरकारकडून आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाबद्दल भाजपकडून आणि भाजपच्या मित्र पक्षाकडून अर्थसंकल्पाचे कौतूक केले गेले. तर विरोधकांनी मात्र अर्थसंकल्प म्हणजे हा मोदी सरकारच्या घोषणांचा पाऊस असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी मत मांडताना सांगितले की, हे बजेट म्हणजे खोदा पहाड निकला चूहा अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे.

आमदार जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पाचे विश्लेषण करताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. त्यांनी अर्थसंकल्प हा देशाचा असला तरी त्यातून फक्त घोषणा केल्याचे दिसून आले आहे.

नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून अनेक घोषणा केल्या जात आहेत. मात्र त्या प्रत्यक्षात येतात किती असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

जनसामान्यांचे आणि मध्यमवर्गीयांचा हा अर्थसंकल्प आहे असं सांगण्यात येत असले तरी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे खोदा पहाड निकला चूहा अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प सादर केला गेला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी त्यातून दाखवण्याचा प्रयत्न भाजपने केला असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. मात्र यातून काहीही साध्य होणार नाही असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केला आहे.

भाजपने ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याची घोषणा केली होती. याच पद्धतीच्या मोठमोठ्या घोषणा भारतीय जनता पक्षाकडून केल्या जातात. 2014 पासूनही अशाच पद्धतीच्या घोषणा करण्यात आल्या होत्या.

मागील वर्षीही 2022 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करण्यात आली होती, त्या घोषणेचे नेमके काय झाले या प्रश्नाचे उत्तर नरेंद्र मोदी यांच्याकडे नाही असा टोलाही त्यानी लगावला आहे.

मोदी सरकारकडून आता नव नवी टार्गेट दिली जात आहेत. मात्र याचा अर्थ फक्त घोषणाबाजींचा पाऊस पाडला जात आहे अशी टीका मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर त्यांनी केली आहे.