Rajya Sabha Election 2022 : भाजपा आमदारांच्या तक्रारीनंतर आव्हाडांचं मत बाद होणार का? आव्हाड म्हणतात, भाजपावाले बावचळलेत!

| Updated on: Jun 10, 2022 | 1:48 PM

जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची मतपत्रिका जयंत पाटील तर यशोमती ठाकूर यांनी त्यांची मतपत्रिका नाना पटोले यांच्या हाती सोपवली. त्यावर भाजपाने आक्षेप घेतला. ही मतदानाची पद्धत नाही. त्यामुळे त्यांचे मत बाद व्हावे, अशी तक्रार पराग अळवणी यांनी केली.

Rajya Sabha Election 2022 : भाजपा आमदारांच्या तक्रारीनंतर आव्हाडांचं मत बाद होणार का? आव्हाड म्हणतात, भाजपावाले बावचळलेत!
भाजपावर टीका करताना जितेंद्र आव्हाड
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : मी पाठमोरा होतो. केबिन एवढीशी. मग मतपत्रिका यांना दिसली कशी? थ्रीडी कॅमेरे आहेत की काय यांच्याकडे, असा सवाल करत भाजपावाले बावचळलेत, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे. मुंबईत राज्यसभेसाठीचे मतदान केल्यानंतर त्यांनी ही टीका केली आहे. आव्हाडांनी जयंत पाटील यांच्या हाती मतपत्रिका दिल्याने आव्हाडांच्या मतावर भाजपा आमदार पराग अळवणी (Parag Alavani) यांनी आक्षेप घेतला, त्यावर आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली. आव्हाड यांच्यासह काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्याही मतावर आक्षेप घेण्यात आला. आव्हाड म्हणाले, की मतदानावर जे नियम आहेत, त्याप्रमाणे मतदान (Voting) केले. ते (भाजपा) काय बोलतात, यावर आम्ही प्रतिक्रिया द्यायची का, असा सवाल त्यांनी केला आहे.

‘टीव्हीवर चर्चा व्हावी म्हणून?’

माझ्या मतदानावर आक्षेप घेऊन साध्य काय होणार. टीव्हीवर दोन तास चर्चा होणार, त्यासाठी इतरी धडपड सुरू आहे. महाविकास आघाडीत काय सुरू आहे, हे आमचे आम्ही पाहून घेऊ, तुम्हाला काय करायचे आहे? स्वत:च्या खाली काय जळते आहे ते पाहायचे सोडून दुसऱ्याचे वाकून पाहिले की खाली जास्त आग लागते, असा घणाघात त्यांनी केला. सगळी बुद्धी अळवणी यांनाच दिली आहे का, असा सवाल करत त्यांनी भाजपा नेते पराग अळवणी यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच त्यांनी आक्षेप घेतला तर घेतला. काय फरक पडतो. मात्र यावरून ते किती घाबरलेत, हेच दिसते, असा घणाघात त्यांनी केला.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

हे सुद्धा वाचा

नियम काय?

जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची मतपत्रिका जयंत पाटील तर यशोमती ठाकूर यांनी त्यांची मतपत्रिका नाना पटोले यांच्या हाती सोपवली. त्यावर भाजपाने आक्षेप घेतला. ही मतदानाची पद्धत नाही. त्यामुळे त्यांचे मत बाद व्हावे, अशी तक्रार पराग अळवणी यांनी केली. निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्यांनी यासंबंधी तक्रार करून महाविकास आघाडीची ही दोन मते बाद करण्याची विनंती केली आहे. ही दोन मते बाद झाल्यास महाविकास आघाडी अडचणीत येवू शकते.