AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP National Executive List: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून कुणाला डच्चू? कुणाला लागणार लॉटरी? या दोन बड्या नेत्यांची धाकधूक वाढली

NCP National Executive List: एनसीपीच्या नव्या कार्यकारिणी पुन्हा चर्चेत आली आहे. कारण या कार्यकारिणीतून दोन बड्या नेत्यांना डच्चू देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर काहींची नाराजी दूर करण्यात येणार असल्याचे समजते. काय आहे याविषयीची मोठी अपडेट?

NCP National Executive List: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून कुणाला डच्चू? कुणाला लागणार लॉटरी? या दोन बड्या नेत्यांची धाकधूक वाढली
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून कुणाला डच्चू?Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 27, 2026 | 10:33 AM
Share

NCP National Executive List: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरून मोठा गोंधळ उडाला होता. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख नसल्याने चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर या दोघांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे गोंधळात अजून भर पडली. राष्ट्रवादीत काहीच आलबेल नसल्याचा दावा करण्यात आला. तर राष्ट्रवादी आता नवीन कार्यकारिणीची यादी लवकरच निवडणूक आयोगाला देणार आहे. त्यात दोन नेत्यांना डच्चू मिळणार असल्याचे समजते. तर काहींना लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवीन कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाला

राष्ट्रवादीच्या नवीन कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाला लवकरच दिली जाणार आहे. कार्यकारिणीमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल पाटेल यांच्या पदाचा उल्लेख न केल्याने नाराजीचा सूर होता. नवख्या लोकांना कार्यकारणीत स्थान दिल्याने तटकरे आणि पटेल यांची नाराजी होती. त्यांनी या नवीन लोकांऐवजी पक्षासाठी राबलेल्या जुन्या चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी केल्याचे समजते. त्यानुसार राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत बदल करून नवीन यादी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कुणाला मिळणार डच्चू?

या महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची अंतिम यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्या नावाचा समावेश नसल्याने चर्चेला उधाण आले होते. तर नंतर ही तांत्रिक चूक असल्याचे सांगत या वादावर पांघरूण घालण्यात आले. या कार्यकारिणीत सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष, पार्थ पवार महासचिव, तर जय पवार यांना राष्ट्रीय सचिव असा उल्लेख करण्यात आला होता. या कार्यकारिणीवर तटकरे आणि पटेल हे नाराज होते. या कार्यकारिणीत काही नवीन चेहऱ्यांना स्थान दिल्याने ते नाराज झाल्याचे समोर आले होते. आतासुबोध मोहिते आणि प्रजापती यांनाही कार्यकारणीतून वगळले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

कुणाला मिळणार संधी?

सना मलिक यांच्याऐवजी हसन मुश्रीफ यांना कार्यकारिणीत स्थान देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर त्याचबरोबर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता नवीन कार्यकारिणी समोर आल्यानंतर कुणाला संधी दिली आणि कुणाला डच्चू देण्यात आला हे लवकरच समोर येईल. पण तोपर्यंत या मुद्यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Follow Us
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची मोठी चूक, आता... जरांगे संतप्त
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची खूप मोठी चूक, आता... मनोज जरांगे मुंबईत बदला घेणार?
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय...
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय वातावरण तापलं?
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी...
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी... पहा व्हिडीओ
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... जरांगेंचा थेट संजय जाधवांना
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... मनोज जरांगेंचा थेट खासदार संजय जाधवांना फोन
राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
Supriya Sule : राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ; पक्षात नेमकं काय घडतंय?
ज्याला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा,तो...मोहन भावगवत काय म्हणाले?
Mohan Bhagwat | ज्या हिंदूला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा, कदाचित तो हिंदू नसेल - भागवत
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधव...
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा प्रचंड जनसागर
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... शिवसेना सुनावणीआधीच...
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... सुनावणीआधीच राऊत अचानक असं काय म्हणाले?
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये एकनाथ शिंदे धावले
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही धावले, पहा व्हिडीओ