
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. मुंबई, पुणे, नाशिक यांसह देशभरात ठिकठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज ३१ डिसेंबर २०२५ च्या रात्री कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेला कोणतेही गालबोट लागू नये आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा हिरमोड होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. मुंबईसारख्या ठिकाणी दरवर्षी होणारी अलोट गर्दी लक्षात घेता गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी आणि जुहू चौपाटी यांसारख्या स्थळांवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात केवळ स्थानिकच नव्हे तर देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकाराला घडू नये यासाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर कालपासूनच पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी उत्साहात पण शिस्तीत नवीन वर्षाचे स्वागत करावे, यासाठी विविध भागात बॅरिकेटिंग आणि विशेष तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.
With New Year’s Eve celebrations underway across Mumbai and the suburbs, police bandobast has been strengthened to maintain law and order.
Citizens are urged to cooperate with police staff on the ground, stay alert, and report any suspicious objects/ individuals. For… pic.twitter.com/ncs0qRYIi0
— मुंबई पोलीस Mumbai Police (@MumbaiPolice) December 30, 2025
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह संपूर्ण देश सज्ज झाला असून, ३१ डिसेंबर २०२५ च्या रात्री सुरक्षितता राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. मुंबईत विशेषतः गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह आणि जुहू चौपाटी यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी शहर आणि उपनगरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १७,००० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. यामध्ये राज्य राखीव पोलीस दल (SRPF) आणि क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) यांसारख्या विशेष तुकड्यांचाही समावेश आहे.
तसेच छेडछाड आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस तैनात असणार आहेत. तसेच मुख्य नियंत्रण कक्षातून शहरभर पसरलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाईल. त्यासोबतच पुणे आणि नाशिक या शहरांमध्येही मुख्य बाजारपेठा आणि सेलिब्रेशन पॉईंट्सवर पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.
दक्षिण मुंबई: मरिन ड्राईव्ह आणि गेटवे ऑफ इंडियाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या प्रवेशावर मर्यादा असतील. काही रस्ते नो पार्किंग आणि वन वे करण्यात आले आहेत.
पश्चिम उपनगरे: जुहू आणि वांद्रे बँडस्टँड परिसरात सायंकाळनंतर वाहनांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी डायव्हर्सन्स देण्यात आले आहेत.
ड्रिंक अँड ड्राईव्ह: मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध Zero-Tolerance धोरण राबवले जाईल. ठिकठिकाणी नाकाबंदी करून ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली जाईल.
🛑 दिनांक ३१/१२/२०२५रोजी १७.००वा. पासून गर्दी संपेपर्यंत पुणे परिसरातील वाहतुकीत करण्यात येणाऱ्या बदलाबाबत प्रसिद्धिपत्रक.. pic.twitter.com/ktxFva3wwj
— पुणे शहर वाहतूक पोलीस (@PuneCityTraffic) December 30, 2025
दिल्लीतील कनॉट प्लेसमध्ये संध्याकाळी ७ नंतर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असेल. राजीव चौक मेट्रो स्टेशनचे एक्झिट गेट रात्री ९ नंतर बंद राहतील. तर बंगळुरूत स्टंट रायडिंग रोखण्यासाठी विमानतळ उड्डाणपूल वगळता सर्व फ्लायओव्हर रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत बंद राहतील. एम.जी. रोड आणि ब्रिगेड रोड केवळ पादचाऱ्यांसाठी असणार आहे. तसेच चेन्नईतील मरीना बीचवर जाण्यास बंदी असेल. तर हैदराबादमध्ये टँक बंड आणि पीव्हीएनआर मार्ग रात्री ११ ते २ या वेळेत बंद राहतील.
तसेच गोव्यात कलंगुट-बागा आणि बोगमालो बीच परिसरात वन-वे वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. त्यासोबतच जम्मू-काश्मीर व उत्तराखंडमध्ये पर्यटकांची वाढती संख्या पाहून अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४०० हून अधिक चालकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
दरम्यान पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ १०० किंवा ११२ वर संपर्क साधावा. सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी किंवा स्टंट करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. तरी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करून उत्साहात पण नियमात राहून नवीन वर्षाचे स्वागत करावे, अशी सूचना देण्यात आली आहे.