Corona Virus Strain: रत्नागिरी 10, नगर 13, कल्याण-डोंबिवली 55, इंग्लंडमधून आलेल्यांमुळे प्रशासनाला धाकधूक

| Updated on: Dec 24, 2020 | 8:39 PM

इंग्लंडहून रत्नागिरीमध्ये 10, अहमदनगरमध्ये 13 आणि कल्याण डोंबिवलीमध्ये 13 परतल्याची माहिती प्राप्त झालीय. (England Return citizens to Maharashtra)

Corona Virus Strain: रत्नागिरी 10, नगर 13, कल्याण-डोंबिवली 55, इंग्लंडमधून आलेल्यांमुळे प्रशासनाला धाकधूक
इंग्लडहून महाराष्ट्रात परतलेल्या नागरिकांमुळं चिंता वाढलीय
Follow us on

मुंबई: ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार आढळून आल्यानंतर संपूर्ण जग चिंतेत आहे. राज्य सरकारनं या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. इंग्लंडहून राज्यात परतलेल्यांची माहिती समोर येत आहे. रत्नागिरीमध्ये 10, अहमदनगरमध्ये 13 जण परतले आहेत. तर, कल्याण डोंबिवली महापालिकेला 55 जणांच्या नावाची यादी प्राप्त झालीय. इंग्लंडमधून आलेल्या प्रवाशांमुळे प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. (England Return citizens increased tension of  Maharashtra Government due to coronavirus strain )

रत्नागिरीत लंडनहून 10 जण आले

ब्रिटनमधील नव्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात लंडनवरुन 10 जण आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळाली आहे. यानंतर रत्नागिरीतील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मागील दहा दिवसांत हे दहा जण जिल्ह्यात दाखल झाले आहेत. 10 जणांच्या नावांची यादी आरोग्य यंत्रणेला विमानतळ प्रशासनाकडून मिळाली आहे. आरोग्य यंत्रणेने तात्काळ या दहाही जणांचा शोध घेतलाय. यापैकी 7 जण हे रत्नागिरी तालुक्यातील तर 3 जण संगमेश्वर तालुक्यातील असल्याचं आढळून आलं आहे.

अहमदनगरचे 13 जण परतले

अहमदनगर शहरातील 11 आणि श्रीगोंदा आणि संगमनेर येथील प्रत्येकी एक जण असे 13 नागरिक इंग्लंडहून परतले आहेत. 7 डिसेंबरपासून विविध ठिकाणी इंग्लंडहून 13 जण आल्याची माहिती समोर आलीय. इंग्लंडहून आलेल्या शहरातील 11 पैकी 9 जण नगरला आले आहेत तर 2 जण मुबंईत थांबले आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली आहे. अहमदनगरला आलेल्या व्यक्तींचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. त्यांच्या कोरोना अहवालाची प्रतीक्षा असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी दिलीय. इंग्लडहून नगरला आलेल्यांमध्ये मार्केटयार्डमधील 02, कराचीवालानगरमधील 04, गुलमोहोर रोडवरील 03, पाईपलाईनरोड व नवनागापूर येथील प्रत्येकी एक, अशा एकूण 11 जणांचा यात समावेश आहे. संगमनेर आणि श्रीगोंदा येथील एक जणाचा समावेश असल्याचं समोर येत आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेला 55 जणांची माहिती

इंग्लंडहून आलेल्या 55 नागरिकांची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेला सरकारकडून कळवण्यात आली आहे. त्यानुसार त्यांचे सर्वेक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरु केले आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत इंग्लंडहून प्रवास करुन कल्याण डोंबिवलीत आलेल्यांचे सर्वेक्षण सुरु असल्याची माहिती डॉ. प्रतिभा पाटील यांनी दिली. सरकारकडून 55 जणांचा यादी महापालिकेस प्राप्त झाली आहे. या यादीनुसार त्यामध्ये काही नावे डबल झाली आहेत. तर काही जण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बाहेरील आहेत. त्यामुळे महापालिकेला 45 जणांची यादी जुळवण्यात यश आलं आहे.

45 जणांच्या आरटीपीसीआर टेस्ट यापूर्वी झाल्या आहेत. 45 जणांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. त्यांचे सर्वेक्षण महापालिकेने बुधवारपासून सुरु केले असून आरोग्य तपासणीचे नमुने घेतले जात आहेत. यातील काही जणांच्या चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यामध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आहे की नाही केली जाणार आहे. ही तपासणी राष्ट्रीय विष्णाणू संशोधन संस्था पुणे येथे होते. तिथे पॉझिटिव्ह आलेले नमुने तपासणीला पाठवले जातील, असं प्रतिभा पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, नागपूरला देखील एक जण गेल्या काही दिवसांमध्ये ब्रिटनहून परतला आहे. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं विदर्भाची धाकधूक वाढली आहे.

संबंधित बातम्या:

राज्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी, जाणून घ्या नियम काय सांगतात

लंडनवरुन 10 जण रत्नागिरीत, अख्खं कोकण टेन्शनमध्ये

(England Return citizens increased tension of  Maharashtra Government due to coronavirus strain )