लंडनवरुन 10 जण रत्नागिरीत, अख्खं कोकण टेन्शनमध्ये

कोरोनाची नवी प्रजाती आढळून आल्याने संपूर्ण ब्रिटनमध्ये दहशत निर्माण झाली आहे. (10 passenger arrived from london, tension in ratnagiri)

लंडनवरुन 10 जण रत्नागिरीत, अख्खं कोकण टेन्शनमध्ये
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 4:01 PM

रत्नागिरी: कोरोनाची नवी प्रजाती आढळून आल्याने संपूर्ण ब्रिटनमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या जीवघेण्या विषाणूमुळे अनेक देशांनी ब्रिटनहून येणारी विमानसेवाच बंद केली आहे. भारतातही खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनमधून येणारी विमानसेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, रत्नागिरीत गेल्या 10 दिवसात 10 प्रवासी लंडनहून आल्याचे आढळून आल्याने रत्नागिरीच नव्हे तर अख्खं कोकण टेन्शमनध्ये आले आहे. (10 passenger arrived from london, tension in ratnagiri)

ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाची दहशत निर्माण झाल्याने भारतातही गेल्या काही दिवसात ब्रिटनमधून आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वॉरंटाईन केलं जात आहे. ही शोधाशोध सुरू असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात लंडनवरुन 10 जण आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळताच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मागील दहा दिवसांत हे दहा जण जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांच्या नावांची यादी आरोग्य यंत्रणेला विमानतळ प्रशासनाकडून मिळाली. तात्काळ या दहाही जणांचा शोध आरोग्य यंत्रणेने घेतला असून यापैकी 7 जण हे रत्नागिरी तालुक्यातील तर 3 जण संगमेश्वर तालुक्यातील असल्याचं आढळून आलं आहे.

चेन्नई, रायगडला रवाना

रत्नागिरी तालुक्यातील 7 जणांपैकी एकजण चेन्नईला तर दुसरा रायगडला गेला आहे. उरलेले पाच जण रत्नागिरी शहरातील असून सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची स्वॅब टेस्ट करून त्यांना एमआयडीसी येथे विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. त्यांचा रिपोर्ट आल्यानंतरच त्यांच्यावरील उपचाराबाबतचा पुढील निर्णय घेतला जाणार आहे. शिवाय हे दहाही जण गेल्या दहा दिवसांत कुणाकुणाच्या संपर्कात आले होते, याची यादी तयार करण्यात येत असून या नागरिकांच्या संपर्कात आलेल्यांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वॉरंटाईन करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, रत्नागिरीत लंडनहून आलेले दहाजण सापडल्याने कोकणातील ग्रामस्थांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. (10 passenger arrived from london, tension in ratnagiri)

संबंधित बातम्या:

ब्रिटनमध्ये कोरोनाचा आणखी एक घातक अवतार, वेगवान संसर्गामुळे खळबळ

केवळ मास्कमुळे कोरोनापासून बचाव अशक्य, नव्या संशोधनाने भीती वाढली!

नव्या कोरोनाचा धसका; संपूर्ण 2021पर्यंत मास्क, सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक: डॉ. संजय ओक

(10 passenger arrived from london, tension in ratnagiri)

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.