केवळ मास्कमुळे कोरोनापासून बचाव अशक्य, नव्या संशोधनाने भीती वाढली!

संपूर्ण जगात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. सध्या जगभरात या विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या लसींवर संशोधन सुरु आहे.

केवळ मास्कमुळे कोरोनापासून बचाव अशक्य, नव्या संशोधनाने भीती वाढली!
मास्क
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 4:51 PM

मुंबई : संपूर्ण जगात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. सध्या जगभरात या विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या लसींवर संशोधन सुरु आहे. यातच आता कोरोना विषाणूच्या संसर्गावर एक नवीन अभ्यास समोर आला आहे. या संशोधन अभ्यासनुसार केवळ मास्क वापरून कोरोनाचा संसर्ग टाळता येणार नाही, तर हा संसर्ग टाळण्यासाठी आपल्या शारिरीक अंतराची अर्थात सोशल डिस्टंन्सिगची काळजी घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे. हे नवे संशोधन फिजिक्स ऑफ फ्लुइड्समध्ये प्रकाशित झाले आहे (Only mask can not prevent corona virus says new study).

खोकला किंवा शिंकताना पाच वेगवेगळ्या प्रकारचे मास्क SARS-CoV-2 अर्थात कोरोना विषाणूवर कसा परिणाम करतात आणि या विषाणूचा प्रसार रोखण्यात कशी मदत करतात, याचा अभ्यास या संशोधनात केला गेला आहे. संशोधकांनी हे सर्व प्रकारचे प्रतिबंध घालणारे साहित्य तपासून पहिले. या साहित्यांमुळे विषाणूचे संसर्ग होऊ शकणार्‍या थेंबांची संख्या कमी झाली होती. तथापि, खोकला किंवा शिंकेतून येणारे हे थेंब जेव्हा आपल्या एखाद्या व्यक्तीशी शारिरीक अंतर 6 फुटांपेक्षा कमी असेल, तेव्हा ते संक्रमित होण्यास मदत करू शकतात.

6 फुटांचे अंतर बंधनकारक!

अमेरिकेतील न्यू मेक्सिको स्टेट युनिव्हर्सिटीचे सहाय्यक प्राध्यापक कृष्णा कोटा यासंदर्भात बोलताना म्हणाले की, ‘मास्क नक्कीच संक्रमण पसरण्यापासून रोखू शकतो. परंतु, जर लोक एकमेकांच्या अगदी जवळ गेले तर, हा व्हायरस पसरण्याची शक्यता अजूनही आहे.’ ते म्हणाले की, केवळ मास्कच नाही तर, 6 फुटांचे शारीरिक अंतर देखील संक्रमण टाळण्यास मदत करेल (Only mask can not prevent corona virus says new study).

या नव्या संशोधनादरम्यान संशोधकांनी सामान्य फॅब्रिक मास्क व्यतिरिक्त टू लेयर क्लॉश मास्क, वेट टू-लेयर क्लॉश मास्क, सर्जिकल मास्क आणि एन-95 मास्क या प्रकारचे मास्क वापरले होते. हे सर्व मास्क वेगवेगळ्या मार्गांनी संक्रमण रोखण्यासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, या संशोधानानंतरच ते म्हणाले की, दोन व्यक्तींमध्ये सहा फूट शारीरिक अंतर न राखल्यास कोरोना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.

कोरोनाची नवी प्रजाती

कोरोनावरील लस संशोधन सुरु असतानाच ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळल्याने संपूर्ण जगात खळबळ माजली आहे. या नव्या प्रजातीमुळे कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनतर आता फक्त ब्रिटनच नाही, तर इतरही देशात कोरोनाची ही नवी प्रजाती आढळल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मध्यंतरी कोरोना संसर्गावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलेल्या देशांमध्ये कोरोना पुन्हा फोफावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(Only mask can not prevent corona virus says new study)

हेही वाचा : 

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.