फडणवीस एका बॉलमध्ये चार विकेट घेतील; संजय राऊत सोयीनुसार बोलतात: प्रसाद लाड

| Updated on: Apr 06, 2021 | 3:52 PM

देवेंद्र फडणवीस एका बॉलमध्ये चार विकेट काढणार आहेत. लवकरच आणखी काही चेहरे समोर येतील. | BJP Prasad Lad

फडणवीस एका बॉलमध्ये चार विकेट घेतील; संजय राऊत सोयीनुसार बोलतात: प्रसाद लाड
प्रसाद लाड
Follow us on

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत हे स्वत:च्या मर्जीनुसार शिवसेनेचे प्रवक्तेपद मिरवतात. त्यांना वाटतं तेव्हाच ते प्रसारमाध्यमांना उत्तरं देतात, असे वक्तव्य भाजप नेते प्रसाद लाड यांनी केले. परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे महाविकासआघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi govt) खरा चेहरा लोकांसमोर आल्याचेही त्यांनी म्हटले. (BJP leader Prasad lad take a dig Thackeray govt)

प्रसाद लाड यांनी मंगळवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकारला इशारा दिला. देवेंद्र फडणवीस एका बॉलमध्ये चार विकेट काढणार आहेत. लवकरच आणखी काही चेहरे समोर येतील, असा दावा प्रसाद लाड यांनी केला. तसेच सचिन वाझे यांच्यावर राजकीय वरदहस्त होता. त्यांचा बाप कोण होता, हे लवकरच समजेल. राष्ट्रीय तपासयंत्रणा (NIA) लवकरच मिठी नदीतील घाणीचा उलगडा करेल, असेही प्रसाद लाड यांनी सांगितले.

‘काऊंटडाऊन सुरु झालाय; उद्धव ठाकरेंना 40 दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल’

उद्धव ठाकरे यांना साधू हत्येचं पातक फेडावं लागेल. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना साधुंचे तळतळाट भोवले. आता येत्या 40 दिवसांत त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागेल, असे वक्तव्य आचार्य तुषार भोसले यांनी केले आहे.

ते मंगळवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर आगपाखड केली. अनिल देशमुख यांना साधू हत्येचा तळतळाट लागला तसेच तुम्हालाही पाप फेडावे लागणार आहे. आता पुढचा नंबर उद्धव ठाकरे यांचा आहे. ठाकरे सरकारची उलटगणती सुरु झाली आहे. 40 दिवसांच्या आत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल, असा दावा आचार्य तुषार भोसले यांनी केला.

येत्या आठ दिवसात तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ

शिवसेना नेते संजय राठोड यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक मोठं विधान केलं आहे. येत्या आठ दिवसात आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. मात्र, या मंत्र्याचं नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे ठाकरे सरकारमधील कोणता मंत्री राजीनामा देणार? याबाबतचे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

संबंधित बातम्या:

उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत देवेंद्र फडणवीसांशी खोटं बोलले: चंद्रकांत पाटील

रश्मी वहिनींची तब्येत कशी आहे? देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन

(BJP leader Prasad lad take a dig Thackeray govt)