AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकार पाडण्याचे भाजपचे प्रयत्न; राज ठाकरेंच्या मनातही ‘तेच’?, म्हणाले…

भाजपकडून राज्यातील ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (raj thackeray reaction on BJP's claim Thackeray sarkar to collapse)

ठाकरे सरकार पाडण्याचे भाजपचे प्रयत्न; राज ठाकरेंच्या मनातही 'तेच'?, म्हणाले...
राज ठाकरे
| Updated on: Apr 06, 2021 | 1:26 PM
Share

मुंबई: भाजपकडून राज्यातील ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कृतीचं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समर्थन केलं आहे. राज यांनी थेट पत्रकार परिषदेतच भाजपच्या या कृतीचं समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (raj thackeray reaction on BJP’s claim Thackeray sarkar to collapse)

राज ठाकरे यांनी लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या बैठकीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. या बैठकीत राज यांनी लॉकाडऊनबाबतची मनसेची भूमिका विशद करतानाच राज्यातील विविध प्रश्नांवरही उत्तरे दिली. यावेळी राज यांना ठाकरे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होत असल्याचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज यांनी त्यांच्या खास ठाकरे शैलीतच उत्तर दिलं. सत्ता पाडण्यासाठी प्रयत्न होत असतील तर त्या मंत्र्यांकडूनही काही प्रयत्न होत असतील ना? ती काय इमारत आहे का खालचे पिल्लर काढायला. त्या मंत्र्यांकडून असं काही तरी घडतंय म्हणून त्यांना राजीनामे द्यावे लागत आहेत. ही पण गोष्ट समजली पाहिजे ना, असं नुसतंच सरकार पाडता येत नाही, असं राज म्हणाले.

पवार-शहा भेटीबाबत नो कमेंट

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अहमदाबादमधील भेटीबाबतही राज यांना यावेळी विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला.

… तर परमबीर सिंग बोलले असते का?

राज यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनाही फैलावर घेतलं. देशमुखांनी 100 कोटी वसुलीचं टार्गेट दिलं होतं. याचा साक्षात्कार परमबीर सिंगांना त्यांना पदावरून हटवल्यावरच का झाला? काढलं नसतं तर ते बोलले नसते का?, असा सवाल करतानाच बदल्यांचा बाजार होतच असतो. तो काही आजच होत नाही. अनेकजण मंत्रालयात कान लावून बसलेले असतात, असंही ते म्हणाले.

जमील शेख हत्याप्रकणावर काय म्हणाले?

मनसेचा पक्षाचा पदाधिकारी जमील शेख यांची हत्या झाली. या हत्याप्रकरणाचा उत्तर प्रदेशपर्यंत तपास करण्यात आला. यावेळी काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी कबुली जबाब दिला असून यात ठाण्यातील राष्ट्रवादीचा नगरसेवक नजीब मुल्लाचं नाव आलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांची प्रेसनोट आहे, त्यामध्ये नजीम मुल्लाचं नाव आहे. नजीब मुल्ला यांनीच जमील शेख यांची हत्या करण्याची सुपारी दिली होती, असं या प्रेसनोटमध्ये म्हटलं आहे. सत्ताधारीची लोक दिवसाढवळ्या लोकांना मारत आहेत. याच नजीम मुल्लाचं नाव सूरज परमार बिल्डर आत्महत्या प्रकरणात आलं होतं. ती केसही रफादफा झाली. आता पुन्हा नाव आलं आहे. आता राज्य सरकार काय करतंय हे पाहतोय, असं राज म्हणाले. तसेच या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून नजीब मुल्लावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. (raj thackeray reaction on BJP’s claim Thackeray sarkar to collapse)

संबंधित बातम्या:

Raj Thackeray PC LIVE : दहावी-बारावी विद्यार्थ्यांना प्रमोट करा, राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

महाराष्ट्रात कोरोना का वाढला?; राज ठाकरे यांनी सांगितली दोन कारणं!

‘किंबहुना’ वापरलं तर चालेल ना; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या शैलीवर मिश्किल टिप्पणी

(raj thackeray reaction on BJP’s claim Thackeray sarkar to collapse)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.