नितीश कुमार-शरद पवार यांची भेट, देशातील विरोधी पक्ष एकत्र येणार?, चर्चेत नेमकं काय घडलं?

| Updated on: May 11, 2023 | 4:25 PM

देशातील माहौल पाहिल्यानंतर लोकशाही वाचवण्यासाठी सोबत राहून काम करणे गरजेचे आहे. सोबत काम केल्यास देशाला विरोधी पक्षांचा चांगला पर्याय मिळेल.

नितीश कुमार-शरद पवार यांची भेट, देशातील विरोधी पक्ष एकत्र येणार?, चर्चेत नेमकं काय घडलं?
Follow us on

विजय गायकवाड, प्रतिनिधी, मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशात विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी भेट देणे सुरू केले आहे. दोन दिवसांपूर्वी ते ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटवाईक यांना भेटले. देशात २०२४ च्या निवडणुकीत विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपला निवडणुकीत टक्कर देऊ शकतात. याचसंदर्भात आज नितीश कुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. शरद पवार म्हणाले, देशातील माहौल पाहिल्यानंतर लोकशाही वाचवण्यासाठी सोबत राहून काम करणे गरजेचे आहे. सोबत काम केल्यास देशाला विरोधी पक्षांचा चांगला पर्याय मिळेल. त्या पर्यायाला लोकं समर्थन देतील.

देशात दुसरा पर्याय निर्माण करू

कर्नाटकातील जनता भाजपचा पराभव करेल. ही कर्नाटकातचं नव्हे तर देशात स्थिती आहे. त्यासाठी आम्हाला मिळून काम करावं लागेल. देशात दुसरा पर्याय निर्माण करण्यासाठी नितीशकुमार यांनी सुरुवात केली आहे. त्यासंदर्भात संवाद झाला आहे. दिल्लीत आम्ही बसलो होतो. नितीश कुमार यांच्यासोबत चर्चा केली. त्यावेळी राहुल गांधी, मल्लीकार्जून खर्गे होते, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

देशाच्या हितासाठी एकत्र आलोत

नितीश कुमार म्हणाले, आम्ही भेटायला आलो होतो. देशात भाजप जे काही करते ते देशाच्या हिताचे नाही. देशाच्या हितासाठी आम्ही सर्व विरोधी पक्ष सहमत आहोत. अनेक पक्षांसोबत बोलणं सुरू आहे. त्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ. देशाच्या हितासाठी एकत्र आलो आहोत. सर्वांची संमती आहे.

हे सुद्धा वाचा

विरोधी पक्षांचे लवकरच एकत्रीकरण

विरोधी पक्षांच्या एकत्रिकरणाचे लवकरच नामकरण करू. बहुतेक सर्व विरोधी पक्ष सोबत आहोत. शरद पवार यांना भेटलो. शरद पवार यांनी नुकताच दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला. तो खूप चांगला निर्णय आहे. देशासाठी त्यांना काम करायचं आहे. देशाच्या हितासाठी सोबत काम करणार असल्याचं नितीश कुमार यांनी सांगितलं.

आधी चर्चा नंतर चेहरा

शरद पवार हे विरोधकांचा चेहरा झाल्यास ही आनंदाची गोष्ट राहील, असंही नितीश कुमार म्हणाले. परंतु, आधी सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊ. त्यानंतर चेहरा ठरवू, असं शरद पवार यांनी सांगितलं.