परमबीर सिंग यांच्या याचिकेवर हायकोर्टात मोठ्या निर्णयाची शक्यता, सुनावणीकडे लक्ष

| Updated on: Apr 05, 2021 | 8:08 AM

या याचिकेवर मुंबई हायकोर्टात आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. (Parambir Singh Criminal Plea Hearing on HM Anil Deshmukh)

परमबीर सिंग यांच्या याचिकेवर हायकोर्टात मोठ्या निर्णयाची शक्यता, सुनावणीकडे लक्ष
parambir singh
Follow us on

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param bir Singh) यांच्यावतीने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधातील याचिकेवर आज मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय यासंबंधित इतर याचिकांवरही सुनावणी होण्याची शक्यता आहे. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई हायकोर्टात आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. (Parambir Singh Criminal Plea Hearing on HM Anil Deshmukh)

मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणी होत आहे. परमबीर सिंग यांच्यावतीनं विक्रम ननकानी यांनी बाजू मांडत आहेत. तर, अ‌ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी राज्य सरकारच्या वतीनं बाजूनं मांडली.

गेल्या सुनावणीदरम्यान आदेश राखीव

गेल्या सुनावणीदरम्यान परमबीर सिंग यांच्या याचिकेवरील आदेश राखून ठेवण्यात आला आहे. तर इतरांच्या याचिकेवरील निर्णय अंतिम आदेशासाठी राखीव ठेवला आहे. राज्य सरकारला या आरोपांमधील तथ्य शोधून काढायचं आहे. आरोपांविषयीचं तथ्य बाहेर आणायचं आहे त्यामुळे ही जनहित याचिका फेटाळावी, असा युक्तिवाद कुंभकोणी यांनी केला होता. यानंतर न्यायालयानं तथ्य मांडण्यास सांगितलं. त्यामुळे आज याप्रकरणी काय निर्णय होतो, याकडे सर्वांचचं लक्ष लागलं आहे.

पोलीस अधिकारी, मंत्री आणि राजकारणी सर्व कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहेत का? न्यायमूर्तींंचे खडे बोल

तुम्ही पोलीस अधिकारी आहात, जेव्हा आपल्याला या गुन्ह्याबद्दल कळल तर एफआयआर नोंदवणे आपले कर्तव्य होते. परंतु, आपण तसे केले नाही. तुम्ही तसे का केला नाही. एखाद्या सामान्य माणसालाही एखाद्या गुन्ह्याबद्दल माहिती मिळाल्यास एफआयआर दाखल करणे अपेक्षित असते. परंतु पोलिस अधिकारी म्हणून  गुन्हा घडतोय हे माहिती असूनही एफआयआर दाखल केलेला नाही, हे तुमचं अपयश आहे, असं मुख्य न्यायमूर्तींनी परमबीर सिगांना सुनावलं होतं .

तुम्ही पोलीस आयुक्त आहात, तुमच्यासाठी कायदा बाजूला ठेवला पाहिजे का? पोलीस अधिकारी, मंत्री आणि राजकारणी सर्व कायद्यापेक्षा श्रेष्ठ का? स्वत: ला कायद्यापेक्षा मोठं समजू नका, कायदा तुमच्यावर आहे, असे खडे बोल न्यायमूर्तींनी सुनावले. सध्या राज्याचे पोलीस तपास करतील, असं न्यायमूर्ती म्हणाले. न्यायालयानं जयश्री पाटील यांनी पोलिसात तक्रार नोदंवल्याबद्दल कौतुक केलं. जयश्री पाटील यांनी याप्रकरणी सीबीआयकडेही तक्रार केल्याचं सांगितलं.

कुंभकोणी यांचा युक्तिवाद

परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका फेटाळल्यानंतर त्याचं दिवशी हायकोर्टात याचिका दाखल करु असं सांगतिलं. मात्र तीन दिवसांनतर याचिका दाखल केली. अ‌ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी जनहित याचिका सुनावणी होण्यासारखी नाही, असा युक्तिवाद केला होता.

हायकोर्टानं जनहित याचिकेचं वैयक्तिक याचिकेत रुपांतर करावं का?, अशी विचारणा केली असता कुंभकोणी यांनी परमबीर सिंग यांनी जनहित याचिकेत कोणताही वैयक्तिक उद्देश नसल्याचा उल्लेख केला आहे हे वाचून दाखवलं. कुंभकोणी यांनी एका निकालाचा दाखला देत या प्रकरणी चौकशीचे आदेश देणं योग्य होणार नाही असा युक्तिवाद केला. आणखी एका निकालाचा दाखला देत या प्रकरणात दोन्ही हात आणि मानसिकता देखील दुषित असल्याचा युक्तिवाद कुंभकोणी यांनी केला.

अ‌ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी जयश्री पाटील यांची याचिका कॉपी पेस्ट असल्याचा युक्तिवाद केला. व्हॉटसअप चॅट हा प्रकार परमबीर सिंग यांच्या बदलीनंतर सुरु झाला. तेच कमिशनर आणि गृहमंत्री मागील एक वर्षापासून सोबत काम करत होते. जो पर्यंत बदली झाली नाही काहीच आरोप झाले नाहीत. तर कुंभकोणी यांनी घनश्याम उपाध्याय यांची याचिका बातम्यांच्या आधारावर असल्याचं म्हटलं होतं. (Parambir Singh Criminal Plea Hearing on HM Anil Deshmukh)

संबंधित बातम्या : 

परमबीर सिंगांकडून तगडा वकील मैदानात, 100 कोटींच्या टार्गेटवर हायकोर्टात मोठी सुनावणी