लेटरबॉम्बनंतर परमबीर सिंग यांची पहिली झलक, मुख्यालयात जाऊन पदभार स्वीकारला

| Updated on: Mar 22, 2021 | 12:53 PM

मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंह नाराज झाले होते. | Parambir Singh letter bomb

लेटरबॉम्बनंतर परमबीर सिंग यांची पहिली झलक, मुख्यालयात जाऊन पदभार स्वीकारला
मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंह नाराज झाले होते.
Follow us on

मुंबई: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर पत्र लिहून गंभीर आरोप करणारे गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) नवनिर्वाचित प्रमुख परमबीर सिंह (Parambir Singh) अखेर समोर आले आहेत. त्यांनी सोमवारी होमगार्डच्या मुख्यालयात जाऊन पदभार स्वीकारला. (Former Mumbai CP takes charge as a DG of Home Guard in Mumbai Police)

मलबार हिल येथील नीलिमा या शासकीय इमारतीच्या निवास्थानातून ते सकाळी दहा वाजता बाहेर पडले. त्यानंतर परमबीर सिंह यांची गाडी गिरगाव, मारिनलाईन्स, चर्चगेट स्टेशन असा प्रवास करत पुढे सरकत होती. मात्र, चर्चगेट स्टेशन समोरील सिग्नलपासून त्यांनी तात्काळ यूटर्न मारला आणि ते पुन्हा घरी गेले.

यानंतर परमबीर सिंह साधारण 11.40 च्या सुमारास होमगार्डच्या कार्यालयात दाखल झाले. त्यांनी कार्यालयात पोहचून त्यांनी आपले कामकाज सुरू केले आहे. मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंह नाराज झाले होते. ते होमगार्डचा पदभार न स्वीकारता सुट्टीवर गेले होते. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांनी गंभीर चुका केल्याचे वक्तव्य केल्यानंतर परमबीर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकून एकच खळबळ उडवली होती.

यापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसने परमबीर सिंह यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. मुंबईच्या आयुक्तपदावरून बदली केल्यामुळे आकसापोटी परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केले आहेत, अशी टीका महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून केली जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी परमबीर सिंह यांच्या दिल्ली भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परमबीर सिंह दिल्लीत येऊन गेल्यानंतरच लेटरबॉम्ब प्रकरण घडले, याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

‘परमबीर सिंग यांच्या दिल्लीतील भेटीगाठींची आमच्याकडे माहिती; वेळ येताच एक्सपोज करू’

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बवर प्रतिक्रिया देण्यास नकार देणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आता या संपूर्ण प्रकरणावर मोठं विधान केलं आहे. परमबीर सिंग दिल्लीत कुणाला भेटले होते, याची माहिती आमच्याकडे असून वेळ आल्यावर ती उघड केली जाईल, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांचा बोलविता धनी कोणी आहे का? असा सवाल केला जात आहे.

बदली होणार म्हणून पुरावे गोळा केले

परमबीर सिंग यांनी पाठवलेल्या पत्रामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यातून बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. बदली झाल्यानंतर त्यांनी चिठ्ठी लिहिल्याने अनेक शंका निर्माण झालेल्या आहेत. 17 मार्च रोजी बदली होणार हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे 16 मार्च रोजी त्यांनी प्रश्न विचारून विचारून त्यांचे चॅटचे पुरावे तयार केले.

संबंधित बातम्या:

केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी ढगातून पडलेत का; लेटरबॉम्ब प्रकरण विरोधकांवर बुमरँग होईल: संजय राऊत

भास्कर जाधवांच्या ‘राष्ट्रवादी’वासी चिरंजीवांवर ‘मातोश्री’ची कृपा, विक्रांत जाधवांना ZP अध्यक्षपद

मोठी बातमी: NIA झाली आता ‘ईडी’ची एन्ट्री; परमबीर सिंहांच्या 100 कोटींच्या लेटरबॉम्बची चौकशी करणार?

(Former Mumbai CP takes charge as a DG of Home Guard in Mumbai Police)