कल्याणमध्ये 23 मजली इमारतीची पार्किंग लिफ्ट कोसळली; दोघे जखमी; एक जण कारमध्ये अडकला

| Updated on: Jun 06, 2022 | 7:49 PM

कल्याणमध्ये अहिल्याबाई चौकामध्ये 23 मजली पुण्योदय स्काय इमारतीची पार्किंग लिफ्ट आहे. या लिफ्टचे काम सुरु होते. त्यामुळे लिफ्टची टेस्टिंग करण्यात येत असतानाच त्यामधून कार घेऊन जाण्यात येत होती, त्यावेळी अचानकपणे पार्किंग लिफ्ट कोसळली.

कल्याणमध्ये 23 मजली इमारतीची पार्किंग लिफ्ट कोसळली; दोघे जखमी; एक जण कारमध्ये अडकला
Follow us on

कल्याण: कल्याणच्या अहिलाबाई चौक गाडी येथील पुनोदय स्काय लोंज इमारतीत गाडी पार्किंगची लिफ्ट कोसळली  (Parking Lift Accident) आहे. यामध्ये दोघे जण जखमी (Two Injured) झाल्याचे सागंण्यात येत आहे. पार्किंग लिफ्टमधून गाडी घेऊन जात असताना टेस्टींग करण्यात येत होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक जण कारमध्येच अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना अहिल्याबाई चौकातील 23 मजली पुण्योदय स्काय इमारतीची (23 storey Punyodaya Sky building) पार्किंग लिफ्ट कोसळून झाली आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्याला सुरुवात केली.

अन् पार्किंग लिफ्ट कोसळली

कल्याणमध्ये अहिल्याबाई चौकामध्ये 23 मजली पुण्योदय स्काय इमारतीची पार्किंग लिफ्ट आहे. या लिफ्टचे काम सुरु होते. त्यामुळे लिफ्टची टेस्टिंग करण्यात येत असतानाच त्यामधून कार घेऊन जाण्यात येत होती, त्यावेळी अचानकपणे पार्किंग लिफ्ट कोसळली.

 कर्मचारी कारमध्येच अडकल्याची भीती

यावेळी तीन कर्मचारी काम करत होते, हे तिघेही कर्मचारी जखमी झाले असून कार घेऊन जाणारा कर्मचारी कारमध्येच अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 23 मजली लिफ्ट कोसळली असल्यामुळे या दुर्घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ मदत कार्याला सुरुवात केली. सध्या लिफ्टच्या परिसरात आणखी कोणी अडकले आहे का याचा तपास करण्यात येत असून या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केले गेले आहे.

जखमींना रुग्णालयात दाखल

या दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून लिफ्ट कोसळल्याने त्याखाली आणखी काही जण सापडले आहेत का याचा तपासही सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे लिफ्ट खाली कोणी अडकले आहे का याचाही शोध घेण्यात येत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले गेले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.