AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कबुतरखान्यांवरील बंदीच्या पार्श्वभूमीवर ‘पेटा’ची ठळक भूमिका; जाहिरातबाजीने वेधलं लक्ष

एकीकडे मुंबईतील कबुतरखान्यांचा वाद सुरू असताना आता 'पेटा'च्या जाहिरातबाजीने सर्वांचं लक्ष वेधलंय. प्राणी आणि पक्षांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या संस्थेनं कबुतरांच्या समर्थनार्थ जाहिरातबाजी केली आहे. आम्हीही मुंबईकर असून आमचा आदर करा, अशा आशयाचे जाहिराती लावले आहेत.

कबुतरखान्यांवरील बंदीच्या पार्श्वभूमीवर 'पेटा'ची ठळक भूमिका; जाहिरातबाजीने वेधलं लक्ष
कबुतरखानाImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 24, 2025 | 9:22 AM
Share

मुंबईतील कबुतरखान्यांचा वाद पेटलेला असतानाच प्राणी आणि पक्षांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या ‘पेटा’ या संस्थेनं कबुतरांच्या समर्थनार्थ जाहिरातबाजी सुरू केली आहे. मंत्रालयाजवळच्या बेस्ट उपक्रमाच्या बस स्थानकावर ‘आम्हीही मुंबईकर असून आमचा आदर करा’ अशा आशयाची जाहिरात झळकवण्यात आली आहे. दादर इथल्या कबुतरखान्याजवळही नुकतीच ‘पेटा’ने अशा पद्धतीची जाहिरात झळकवली होती. नागरिकांच्या आक्षेपानंतर संबंधित जाहिरात हटविण्यात आली.

कबुतरांच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्यावर घातक दुष्परिणाम होत असल्याने मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, प्राणीप्रेमी आणि जैन समुदायाने या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून हा वाद आता न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य देण्यास न्यायालयाने बंदी घातली असून नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत.

मुंबई महानगरपालिकेकडे कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य देण्याबाबतच्या अर्जावर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविल्या आहेत. असं असलं तरीही अनेक ठिकाणी प्रशासनाचा डोळा चुकवून कबुतरांना अनधिकृतरित्या खाद्य देण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. दरम्यान कबुतरांचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला महिनाभरात अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे.

कबुतरखान्यांवरील बंदीच्या पार्श्वभूमीवर आता ‘पेटा’ची भूमिका चर्चेत आली आहे. याआधी मंत्रालयाजवळच्या के. सी. महाविद्याल बस स्थानकावर पेटाकडून जाहिरातबाजी करण्यात आली होती. ‘आम्ही देखील मुंबईकर आणि पालक आहोत, आमचा आदर करा’ अशा आशयाची ही जाहिरात होती. दादरमधील कबुतरखाना परिसरात अशीच एक जाहिरात लावण्यात आली होती. त्यावरून नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. अखेर दुसऱ्या दिवशी ही जाहिरात हटविण्यात आली होती.

मुंबई महापालिकेनं कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई केल्यानंतर काही पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर 13 ऑगस्टला झालेल्या सुनावणीच्या वेळी कबुतरांना खाद्य घालण्यावरील बंदीचा मुंबई महापालिकेचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.