इंधन दरवाढीचा फटका, आजपासून मुंबईत उबेरचे चार्ज वाढले, भाड्यात 15 टक्क्यांची वाढ

| Updated on: Apr 02, 2022 | 11:48 AM

पेट्रोलचे भाव वाढल्याने उबेरने (Uber) मुंबईत (MUMBAI) भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून उबेरकडून मुंबईमध्ये 15 टक्क्यांनी भाडे वाढवण्यात आले आहे.

इंधन दरवाढीचा फटका, आजपासून मुंबईत उबेरचे चार्ज वाढले, भाड्यात 15 टक्क्यांची वाढ
Follow us on

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये (Petrol Diesel Price) सातत्याने वाढच होत आहे, आज पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये लिटरमागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली आहे. 22 मार्चपासून ते आजपर्यंत पेट्रोलच्या दरामध्ये सात रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. याचा मोठा फटका हा खासगी वाहतूकदार कंपन्यांना बसत आहे. पेट्रोलचे भाव वाढल्याने उबेरने (Uber) मुंबईत (MUMBAI) भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून उबेरकडून मुंबईमध्ये 15 टक्क्यांनी भाडे वाढवण्यात आले आहे. याबाबत बोलताना कंपनीच्या वतीने सांगण्यात आले की, इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. वाढत्या इंधन दराचा परिणाम हा थेट चालकांवर झाला आहे. चालकांचे मार्जीन घटले आहे. वाढत्या इंधन दरवाढीचा चालकांवरील प्रभाव कमी करण्यासाठी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उबेरच्या भाड्यात 15 टक्के वाढ करण्यात आली असून, आजपासून नवी भाडेवाढ लागू होईल.

वर्षभरात दोनदा भाडेवाढ

गेल्या वर्षभरात उबेरकडून दोनदा भाडेवाढ करण्यात आली आहे. यापूर्वी जुलै 2021 मध्ये उबेरने आपल्या भाड्यामध्ये 15 टक्के वाढ केली होती. त्यानंत आज पुन्हा एकदा उबेरकडून आपल्या भाड्यामध्ये 15 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे मुंबईकर ओला, उबेर यासारखा खासगी वाहतुकीचा उपयोग करतात. त्यांच्या खिश्यावर या निर्णयामुळे ताण पडण्याची शक्याता आहे.

मुंबईमध्ये पेट्रोल 117.57 रुपये लिटर

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ सुरूच आहे. आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या 22 मार्चपासून तब्बल दहा वेळा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. आयओसीएलने दिलेल्या माहितीनुसार आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ झाली आहे. शुक्रवारी इंधनाचे दर स्थिर होते. त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र शनिवारी आज पुन्हा एकदा इंधनाच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे, नव्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 117.57 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर वाढून 101.79 रुपये झाला आहे. देशभरातील जवळपास सर्वच महानगरांमध्ये पेट्रोलच्या किमतीने शंभरचा टप्पा पार केला आहे.

संबंधित बातम्या

Today’s gold, silver prices: सोन्याच्या दरात तेजी, चांदीही वधारली; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

इंधन दरवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत रशियाकडून कच्च्या तेलाची आयात सुरूच ठेवणार; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे स्पष्टीकरण

Emergency in SriLanka: श्रीलंकेत नागरिक रस्त्यावर, आंदोलनाला हिंसक वळण; सरकारकडून आणीबाणीची घोषणा