पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, विमानतळावर जोरदार स्वागत

| Updated on: Jan 19, 2023 | 5:12 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यासाठी गुरुवारी दाखल झाले. मुंबई विमानतळावर दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, विमानतळावर जोरदार स्वागत
Follow us on

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबई दौऱ्यासाठी गुरुवारी दाखल झाले. मुंबई विमानतळावर दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध योजनांचा शुभारंभ आणि भूमिपूजनही होणार आहे.

मुंबईत ३८ हजार कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी मोदी दाखल झाले. यावेळी एका लाखांहून अधिक फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत कर्जही वितरित केले जाणार आहे. नरेंद्र मोदी यांचा दौरा हा मुंबई महानगरपालिकेची बिगुल समजला जात आहे. यामुळे बीकेसीत नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या भाषणातून मोदी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोदी यांच्या सभेसाठी शिंदे गट व भाजपने जोरदार तयारी सुरु केली. बीकेसी मैदानावर एक लाख कार्यकर्त्यांना आणले गेले. त्यासाठी अनेक जिल्ह्यातून खाजगी वाहनांनी कार्यकर्ते दाखल झाले.

हे सुद्धा वाचा

दुपारी ४ वाजून ५० मिनिटांनी भारतीय हवाई दलाच्या विमानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावर दाखल झाले. विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर मोदी यांचा ताफा बीकेसी मैदानाकडे रवाना झाला.