NSG च्या बोगस ओळखपत्राद्वारे पंतप्रधानांच्या बीकेसी रॅलीत घुसखोरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परवाच्या बीकेसी येथील रॅलीत एनएसजी कमांडोचे बनावट ओळखपत्र वापरून एकाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाल्याने यंत्रणा सावध झाल्या आहेत, या इसमाची चौकशी सुरु आहे.

NSG च्या बोगस ओळखपत्राद्वारे पंतप्रधानांच्या बीकेसी रॅलीत घुसखोरी
modirally (1)
Image Credit source: modirally (1)
| Updated on: Jan 21, 2023 | 10:42 AM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीकेसीतील रॅलीत एनएसजी कमांडोचे बनावट ओळखपत्र वापरून एकाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. देशाचे सर्वात शक्तीशाली पद असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अतिशय कडेकोट सुरक्षा पुरविण्यात आलेली आहे. त्यामुळे या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. या इसमाची कसून चौकशी सुरु असून त्याचा हेतू काय होता हे तपासले जात आहे.

बीकेसी येथे 19 जानेवारीच्या सायंकाळी पंतप्रधानांच्या हस्ते अनेक सोयी सुविधांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी प्रचंड सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. तरीही सुरक्षेचे सर्व नियम तोडून एक सफारी सुट परिधान केलेली एक व्यक्ती शिरली होती असे उघडकीस आले आहे.

पंतप्रधानांचा कार्यक्रम असल्याने बीकेसीत विविध पदरी सुरक्षा ठेवण्यात आली होती. परंतू एका इसमाने एनएसजी कंमाडोचे नकली ओळखपत्र गळ्यात अडकवून कडक सफारी परिधान करून बीकेसीत खुसखोरीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. या व्यक्तीच्या एनएसजी कमांडो पदाच्या ओळखपत्र तपासले असता. त्यावर 2022 ते 2025 अशी वैधता तारीख लिहीली होती. त्यावर खोडाखोड केली होती. म्हणून संशय आला. त्या ओळखपत्राला असलेल्या रिबनवर दिल्ली पोलीस सिक्युरीटी PM असे लिहीले होते. त्यामुळे यंत्रणांना संशय आला. हा इसम नवीमुंबईचा रहिवासी असून त्याचे नाव रमेश मिश्रा आहे. त्याने आपण लष्करात सेवा केलेली असून इंडीयन आर्मीच्या गार्ड रेजिमेंट मध्ये असल्याचा दावा केला आहे, पोलीसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे.