कबूतर बचाओ धर्मसभेत राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा, ‘कबुतरं ठरवणार राज सत्तेवर कोण बसणार’

"आम्हाला म्हणता कोर्टाचा अवमान करता, मग कोर्टाचा आदेश आहे मशिदीवरचे भोंगे उतरवा,ते उतरवले का?. दिवाळीची पूजा झाल्यावर राक्षसाचा महिषासुराचा वध करणार" असं रोखठोक इशारा निलेशचंद्र गुरुदेव यांनी दिलाय.

कबूतर बचाओ धर्मसभेत राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा, कबुतरं ठरवणार राज सत्तेवर कोण बसणार
NileshChandra gurudev maharaj
| Updated on: Oct 11, 2025 | 12:47 PM

“शांती दुतांचे प्राण वाचवा. ⁠कबूतर खाने खोला. ⁠धर्म सभेला अनेकांनी विरोध केला. ⁠मी कोणत्या पार्टीचा प्रचार करायला आलो नाही, तर शांती दुतांसाठी आलो आहे.काही बोलत होते कबूतर, कबूतर करत आहेत. ⁠ज्यांनी कबूतरच्या चक्करमुळे कोण कोणती पार्टी जाते माहीत नाही. ⁠आठवले साहेबांची एक पार्टी आहे. जितके कबुतरामुळे मेले नाहीत, तेवढे दारू आणि नशेमुळे मेले. ⁠खूप सारे ढोंगी साधू आहेत ते अपप्रचार करतात.⁠मी कुणाचे समर्थन मागत नाही” असं निलेशचंद्र गुरुदेव म्हणाले. “मी ⁠शांती दूत जनकल्याण पार्टीची घोषणा करतो. ⁠ज्यांचं जनकल्याण आहे ते मुंबई महापालिकेत जातील.⁠आता कबुतरचं निर्णय घेतील की कोण राज सत्तेवर बसेल. ⁠आम्ही शांती प्रिय समाज आहोत. मराठी बोला म्हणतात पण ⁠एकच मर्द पैदा झाला होता तो बाळासाहेब ठाकरे. तो जोपर्यंत होता, तोपर्यंत एकाचाही आवाज नव्हता” असं निलेशचंद्र गुरुदेव म्हणाले.

“आजचा महादेव आहे. कबूतर शांतीदूत आहेत. कबुतरासाठी ही शोक सभा नाही तर शांती सभा आहे.कबुतराला महापालिकेने मारले आहे. देवता फक्त योगी आणि मोदी बनले बाकी सर्व राक्षस आहेत. माझ्या सोबत गुरुजींचा आशीर्वाद आणि चार हजार नागा साधूंची साथ आहे. जरांगे जेव्हा आला तेव्हा दाखवून गेला. दिवाळीची पूजा झाली की आम्ही आमरण उपोषण करणार. आता उपोषण फक्त कबुतरासाठी नाही तर गो मातेसाठी ही करणार. आता मरेल पण झुकणार नाही” असा इशारा निलेशचंद्र गुरुदेव यांनी दिला.

‘मग कोर्टाचा आदेश आहे मशिदीवरचे भोंगे उतरवा,ते उतरवले का?’

“भगवान महावीरचा शिष्य आहे. मला अनेकांच्या धमक्या दिल्या. मी तलावार उचलणार नाही पण आंदोलन आरपार करणार. कोणताही नेता समोर आला तर सोडू नका. आम्हाला म्हणता कोर्टाचा अवमान करता, मग कोर्टाचा आदेश आहे मशिदीवरचे भोंगे उतरवा,ते उतरवले का?. दिवाळीची पूजा झाल्यावर राक्षसाचा महिषासुराचा वध करणार” असं रोखठोक इशारा निलेशचंद्र गुरुदेव यांनी दिलाय.