AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध रिलस्टार समुद्रात बेपत्ता, गणपती विसर्जनावेळी भयंकर घडलं, खोल पाण्यात जाताच…

काल सर्वत्र गणेश विसर्जन सुरु होतं पण नालासोपाऱ्यामध्ये खळबळजनक घटना घडली. एक रीलस्टार हा समुद्रकिनाऱ्यावरुन बेपत्ता झाला आहे. त्याच्यासोबत नेमकं काय घडलं?

प्रसिद्ध रिलस्टार समुद्रात बेपत्ता, गणपती विसर्जनावेळी भयंकर घडलं, खोल पाण्यात जाताच...
krushna vishwakarmaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 26, 2026 | 3:35 PM
Share

नालासोपाऱ्यातील कळंब समुद्र किनाऱ्यावरुन एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. नालासोपा-याच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर पाण्यात उतरलेला प्रसिद्ध रील क्रिएटर कृष्णा विश्वकर्मा समुद्रात बेपत्ता झाला आहे. शुक्रवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास ही हिटना घडली असून, आज रात्रीपर्यंत सुद्धा त्यांचा पत्ता लागला नाही. वसई विरार महापालिका अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी आज रात्री उशिरा पर्यंत शोध मोहीम राबविली मात्र शोध लागला नाही.

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी दुपारी सर्वत्र अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती विसर्जन सुरु होते. याचवेळी कृष्णा विश्वकर्मा हा प्रसिद्ध रील स्टार स्वतःच्या परिवार आणि कुटुंबिय मिंत्रांसोबत नालासोपाऱ्यातील कळंब समुद्रकिनारी पोहोचला होता. कृष्णा नालासोपारामधील संतोष धुन परिसरातील दुर्गा माता मंदिराजवळील गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये वास्तव्य करत असल्याचं सांगितलं जातंय. सोशल मीडियावर रील आणि व्हिडिओ बनवत असल्याने कृष्णा सदरील परिसरामध्ये प्रचंड लोकप्रिय होता.

दरम्यान, नेमकी घटना काय घडली हे सांगताना परिवारातील काही सदस्यांनी असंही सांगितल्याची माहिती समोर आली आहे की, कृष्णा अशा ठिकाणी पाण्यात उतरला जिथे पाणी वरुन तर कमी वाटत होतं पण व्हिडिओ बनवण्यासाठी पाण्यात उतरणं कृष्णाला महागात पडलं. रिल बनवण्याच्या नादात तो खोल पाण्यामध्ये उतरला आणि पुढे सरकत गेला. हळूहळू तो दिसेनासा झाला. परिवाराने शंका उपस्थित केली की, जिथे तो पाण्यामध्ये उतरला तिथे खोल खड्डा असावा ज्यामुळे त्याचा पाण्याचा अंदाज चुकला असावा, परंतू कृष्णा नेमका कुठे गायब झाला आणि त्याच्या गायब होण्यामागचे नेमके खरे कारण अद्याप समोर आलेले नाही.

तो खोल पाण्यात कसा पोहोचला. त्याच्यासोबत नेमकं काय घडलं या संपूर्ण घटनेची अधिकृत माहिती आणि स्पष्टीकरण अजून पुढे आलेलं नाही. दरम्यान, कृष्णा गायब झाल्यानंतर घरच्यांनी लगेचच आसपासच्या लोकांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनीही धावपळ केली परंतू पाण्याची गती आणि एकूण स्थिती पाहून कोणीच पाण्यामध्ये उतरुन त्याला शोधण्याची हिंमत केली नाही.

Follow Us
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?