AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘असली आ रहा है, नकली से सावधान’, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याआधी अयोध्येत शिवसैनिकांची पोस्टरबाजी, मनसेचेही जोरदार प्रत्युत्तर

शिवसेनेने अयोध्येत होर्डिंग्जच्या माध्यमातून राज ठाकरेंवर साधलेल्या निशाण्याला मनसेतून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. कोण असली आणि कोण नकली आहे, हे सारा देश पाहत असल्याची टीका मनसे दादरचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केली आहे. शिवसेनेने हिरवा हातात घेतला आहे आणि सत्तेसाठी हिंदुत्वाला लाथाडले आहे. अशी टीका किल्लेदार यांनी केली आहे.

'असली आ रहा है, नकली से सावधान', आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याआधी अयोध्येत शिवसैनिकांची पोस्टरबाजी, मनसेचेही जोरदार प्रत्युत्तर
Sena MNS asali NakliImage Credit source: TV 9 marathi
| Edited By: | Updated on: May 08, 2022 | 11:19 AM
Share

अयोध्या- मुंबई असली आ रहा है, नकली से सावधानअशा स्वरुपाचे पोस्टर्स, होर्डिंग्ज सध्या अयोध्येत चर्चेचा विषय ठरले आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी शिवसैनिकांतर्फे असे पोस्टर्स थेट अयोध्येत लावण्यात आले आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आदित्य ठाकरे हे अयोध्येचा (Ayodhya) दौरा करणार आहेत. तर त्यांच्यानंतर 5 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) हेही अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिलेल्या आव्हानानंतर, आता अयोध्येत असली आणि नकलीचे पोस्टर्स शिवसेनेकडून लावण्यात आले आहेत. यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टार्गेट करण्याचा शिवसेना प्रयत्न आहे.

मनसेकडूनही जोरदार प्रत्युत्तर

शिवसेनेने अयोध्येत होर्डिंग्जच्या माध्यमातून राज ठाकरेंवर साधलेल्या निशाण्याला मनसेतून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. कोण असली आणि कोण नकली आहे, हे सारा देश पाहत असल्याची टीका मनसे दादरचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केली आहे. शिवसेनेने हिरवा हातात घेतला आहे आणि सत्तेसाठी हिंदुत्वाला लाथाडले आहे. अशी टीका किल्लेदार यांनी केली आहे.

आम्हाला डिवचू नकामनसे

मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली आहे. त्यामुळे शिवसेनेचं हिंदुत्व हे नकली आहे, राज ठाकरेंचे हिंदुत्व हे सोन्यासारखं अस्सल असल्याचं उत्तर मनसेकडून देण्यात आलं आहे. त्यामुळे कोण असली आणि कोण नकली, हे शिवसेनेनं ठरवू नये, महाराष्ट्रातील आणि देशातील जनता ते ठरवेल, उगाच आम्हाला डिवचू नका, असा इशाराही मनसेनं दिला आहे.

कुणाचं हिंदुत्त्व महत्त्वाचं

महापालिका निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतशा हिंदुत्वाचा मुद्दा अधिक तीव्र होत जाणार असे दिसते आहे. भोंग्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ५ जूनला अयोध्या वारी करणार असल्याचे जाहीर केले आहे, त्यांच्यानंतर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या वारी जाहीर करण्यात आली, त्याची तारीख मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात ठरवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेत, राष्ट्रवादीही हिंदुत्वाच्या स्पर्धेत मागे नसल्याचं दाखवून दिलं आहे. भाजपाही या स्पर्धेत आधीपासूनच आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेला भाजपाचे समर्थन असल्याची टीकाही होते आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात वक्तव्य करत, अयोध्येचा आणि पर्यायाने हिंदुत्वाचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले होते.   

आदित्य ठाकरे 10 जूनला अयोध्येत

दरम्यान, येत्या 10 जून रोजी आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. त्याबाबतची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतरच आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.