AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BIG BREAKING : ठरलं! भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार, प्रकाश आंबेडकरांचं स्पष्ट विधान

'प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम' वेबसाईटच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर एकत्र आले.

BIG BREAKING : ठरलं! भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार, प्रकाश आंबेडकरांचं स्पष्ट विधान
| Updated on: Nov 20, 2022 | 10:32 PM
Share

मुंबई : भाजप-शिंदे सरकारविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आता भीमशक्तीची देखील भक्कम साथ मिळणार असल्याच्या वृत्तावर आता शिक्कामोर्तब झालंय. कारण वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत एकत्र यायचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आगामी निवडणुकीत शिवसेना आणि वंचित एकत्र भाजपविरोधात लढेल, असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट म्हटलंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. ‘प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम’ वेबसाईटच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर एकत्र आले. या कार्यक्रमानंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“महाराष्ट्रात सध्या असणारं राज्य हे सुप्रीम कोर्टाच्या स्टे ऑर्डरवर सुरु आहे. सुप्रीम कोर्टाला विनंती आहे की, त्यांनी स्टे ऑर्डरच्या याचिकेबाबत ताबोडतोब निर्णय घ्यावा”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“शिवसेनेसोबत एकत्र कधी येणार हे निवडणूक कधी लागणार यावर अपेक्षित आहे. ताबोडतोब निवडणूक झाली तर लगेच एकत्र येऊ. नंतर निवडणूक लागली तर नंतर येऊ”, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितलं.

वंचितची साथ धरल्यास सेनेला काय फायदा?

वंचिक बहुजन आघाडीच्या राजकीय ताकदीचा विचार केला तर लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत वंचितचे उमेदवार जिथे उभे होते तिथे अनेक ठिकाणी त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची लीड घेऊन ते पराभूत झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे शिवसेनेला वंचित आघाडीची साथ मोलाची ठरू शकते.

उद्धव ठाकरेंची प्रकाश आंबेडकरांना साद

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी कार्यक्रमात भाषण करताना प्रकाश आंबेडकरांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. “आम्ही या निमित्ताने एकत्र आलो आहोत. प्रकाशजी आपल्याला हे काम करावंच लागेल. नुसतं लोकांना जागं करुन उपयोग नाही. आपण जर काही करणार नसू तर लोकं झोपली तर झोपू द्या, त्यांची निद्रानाश तरी नको करुयात. जागं करुन सोडणार असू मग ते न केलेलं बरं नाही. पण आपण ते करणार नसू तर आपल्या दोघांना आपल्या आजोबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही”, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.

उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांना उद्देशून आणखी काय म्हणाले?

“काही वर्षांपूर्वी कलिना येथे असाच कार्यक्रम झाला होता. त्यावेळेला सोबत रामदास आठवले होते. त्यावेळेला ते मला उद्देशून उद्धवजी तुम्ही प्रबोधनकारांचे वैचारिक नातू आहेत, असं म्हटलं होतं. तेव्हा मी त्याला एकत्र ये असं म्हटलं होतं”, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

“आज मला आनंद आणि अभिमान आहे, असं काही नाही की प्रकाशजी आणि माझी ओळख नाही. आम्ही एकमेकांना ओळखतो. मध्यंतरी आमच्या भेटीही झाल्या”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“त्यांना भेटायचं म्हणजे वेळ काढून भेटायला पाहिजे. कारण माहिती आणि ज्ञान याचा धबधबा, त्याला मिनिटांचं गणित लागत नाही. आम्ही आज पहिल्यांदा एका व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. पण वैचारिक व्यासपीठ आमचं दोघांचं एकच आहे. त्यामुळे एकाच व्यासपीठावर एकत्र येण्यात आम्हाला अडचण आली नाही. ज्याची अपेक्षा लोकांना आहे तशी ती येणारही नाही. दोन्ही विचारांचे वारसे घेऊन पुढे आलो आहोत”, असं ठाकरे म्हणाले.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.