AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Loan Waiver: कर्जमाफीचा खुळखुळा? सरसकट कर्जमाफी नाहीच… 12.71 लाख शेतकर्‍यांना मोठा फटका, सरकारचा तो निर्णय वादात

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Debt Relief Scheme: महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मंजूर केली आहे. पण त्यातील अटींमुळे वाद पेटला आहे. विरोधकांसह शेतकरी नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अनेक शेतकर्‍यांना या योजनेचा पूर्ण फायदा मिळणार नाही, असा आरोप करण्यात येत आहे.

Farmer Loan Waiver: कर्जमाफीचा खुळखुळा? सरसकट कर्जमाफी नाहीच... 12.71 लाख शेतकर्‍यांना मोठा फटका, सरकारचा तो निर्णय वादात
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनाImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 04, 2026 | 8:39 AM
Share

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Debt Relief Yojana: राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी महायुतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला कॅबिनेटमध्ये मंजूरी दिली. पण योजनेतील अटी आणि शर्तींने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा पूर्ण फायदा मिळणार नसल्याचे समोर येत आहे. या योजनेत 55 लाख 72 हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा सरकारचा दावा आहे. या योजनेसाठी 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर अटींमुळे वाद पेटला आहे. राज्यातील 12 लाख 71 हजार शेतकर्‍यांना मोठा फटका बसण्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी नेते हा कर्जमाफीचा खुळखुळा असल्याचा आरोप करत आहेत.

12 लाख 71 हजार शेतकर्‍यांच्या तोंडाला पुसली पाने

राज्य सरकारने 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंतचे दोन लाखांचे कर्ज माफ करण्याचे धोरण ठरवले आहे. पण महाविकास आघाडीने राबवविलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. 2019 मध्ये कर्जमाफी घेतलेले शेतकरी, ज्यांची संख्या तब्बल 32 लाख 29 हजार इतकी आहे, जरी ते यावेळी थकित असले तरी त्यांना केवळ 50 हजार रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफी देण्यात येणार आहे. नियमित कर्जदारांना सुद्धा केवळ 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यांनाही किमान दोन वर्ष नियमित कर्जदार असणे ही अट टाकण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या 12 लाख 71 हजार शेतकऱ्यांना केवळ 50 हजारांची मदत करण्याचा निर्णय वादात सापडला आहे. प्रत्यक्षात दोन लाखांच्या आत थकीत कर्जदार 16 लाख 48 हजार शेतकऱ्यांनाच या योजनेचा खऱ्या अर्थाने लाभ होण्याचा दावा करण्यात येत आहे. विरोधकांनी या जाचक अटींवर टीकेची झोड उठवली आहे.

कर्जमाफीचा आला शासन निर्णय

या कर्जमाफी योजनेत मुद्दल आणि व्याजासह दोन लाखांच्या आतील शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होणार आहे. दोन लाखांपेक्षा कमी कर्ज असलेले 16 लाख 48 हजार शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहे. त्यांचा सातबारा कोरा होणार आहे. सरकारच्या तिजोरीवर 14 हजार 754 कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे. या योजनेत कर्जमाफी, प्रोत्साहनपर लाभ तर मागील योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मदत असे तीन प्रमुख घटक समोर आले आहे. या योजनेचा शासन निर्णय काल काढण्यात आला. त्यात योजनेचा तपशील समोर आला आहे.

आता भेदभाव का?

2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती. त्यानंतर 2019 मध्ये या शेतकऱ्यांना महाविकास आघाडीने कर्जमाफीचा लाभ दिला होता. पण आता कर्जमाफी देताना 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50 हजारांची मदत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय वादात सापडला आहे. तर दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या 2 लाख 90 हजार शेतकऱ्यांनाही या कर्जमाफीचा लागलीच लाभ मिळणार नाही. त्यांना दोन लाखांवरील कर्ज फेडावे लागेल. तरच ते या योजनेसाठी पात्र ठरतील.

Follow Us
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल