Platform Ticket | रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट 10 वरुन 50 रुपये, गर्दी टाळण्यासाठी मोठा निर्णय

| Updated on: Mar 17, 2020 | 4:15 PM

रेल्वे प्लॅटफॉर्मवर (Corona effect on platform ticket) गर्दी होऊ नये यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांऐवजी तब्बल 50 रुपये करण्याचा विचार सुरु आहे.

Platform Ticket | रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट 10 वरुन 50 रुपये, गर्दी टाळण्यासाठी मोठा निर्णय
Follow us on

मुंबई :  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शक्य ते सर्व निर्णय घेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर (Corona effect on platform ticket) गर्दी होऊ नये यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांऐवजी तब्बल 50 रुपये करण्यात आलं आहे. फलाटावरील गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, त्यामुळे तो टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट तब्बल पाच पटीने वाढवण्यात आलं आहे. (Corona effect on platform ticket)

मोठमोठ्या रेल्वे स्थानकांसाठी हा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये, लोकांनी अधिक एकत्र एका ठिकाणी जमू नये, जेणेकरून कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेवरील मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर विभागात प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांवरुन 50 रुपये इतकं वाढवण्यात आलं आहे.

मुंबई लोकल 7 दिवस बंद करण्याची शक्यता

कोरोना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मुंबईची लाईफलाईन लोकल रेल्वे, बस आणि मेट्रोसेवा तब्बल 7 दिवस बंद ठेवण्याचा विचार आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, “रेल्वेच्या बोग्यांमध्ये जास्तीतजास्त किती माणसं असावेत याबाबत काही मार्गदर्शक सूचना देण्याबाबत विचार सुरु आहे. कारण पुढील 15 दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण फेज 2 मध्ये आहोत. त्यामुळे या फेजमध्ये कोरोनावर नियंत्रणासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. आपण फेज 2 मधून फेज 3 मध्ये जाऊच नये यासाठी ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या केल्या जातील. औषध कंपन्यांनी जगभरात इतर देशांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जे प्रयत्न झाले त्याचीही माहिती दिली आहे. त्याचाही उपयोग केला जाईल.”

“आपण कोरोनाच्या फेज 2 मध्ये आहोत. फेज 2 मधून फेज 3 मध्ये जाऊच नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेत आहोत”, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Rajesh Tope on Corona Phase 2). तसेच यासाठी जगभरात प्रयत्न झाले आहेत. त्याचा अभ्यास करुन अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले जातील, असंही त्यांनी नमूद केलं. त्यांनी उद्योजकांसोबतच्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती दिली.