Raj Thackeray Aurangabad Live : भोंग्याबाबत कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, गिरीश महाजन यांच्याकडून राज यांची पाठराखण

| Updated on: May 01, 2022 | 4:35 PM

भोंग्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशाची अंमलबजावणीही झाली पाहिजे. यावर दुमत नाही असे म्हणत भाजपचे गिरीश महाजन यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे समर्थन केले आहे. तर दुसरीकडे मात्र मनसेला भाजपचा पाठिंबा नसल्याचेही स्पष्ट केलंय. त्यामुळे भाजप आणि मनसेच्या सलोख्याचा नेमका अंदाज कुणालाच येत नाहीये.

Raj Thackeray Aurangabad Live : भोंग्याबाबत कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, गिरीश महाजन यांच्याकडून राज यांची पाठराखण
गिरीश महाजन
Image Credit source: tv9
Follow us on

जळगाव : राज्यात सध्या औरंगाबादच्या (Aurangabad) सभेने मराठवाड्याात भगवं वादळ उठवलं आहे. राज ठाकरेंनी मशीदीवरील भोंग्याचा मुद्दा उचलल्यापासून हा मुद्दा रोज हेडलाईन्समध्ये आहे. आज राज ठाकरेंची सभा (Raj Thackeray Aurangabad Live) औरंगाबादेत होत असल्याने याबाबत आणखी तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. महाविकास आघाडीकडून या सभेवर जोरदार टीका सुरू आहे. मात्र भाजप नेते गिरीश महाजन यांनी याच मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पाठराखण केली आहे. भोंग्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशाची अंमलबजावणीही झाली पाहिजे. यावर दुमत नाही असे म्हणत भाजपचे गिरीश महाजन यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे समर्थन केले आहे. तर दुसरीकडे मात्र मनसेला भाजपचा पाठिंबा नसल्याचेही स्पष्ट केलंय. त्यामुळे भाजप आणि मनसेच्या सलोख्याचा नेमका अंदाज कुणालाच येत नाहीये.

भाजपचा मनसेला पाठिंबा नाही

औरंगाबाद येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आजची सभा ही जबरदस्त होणार असं सध्या तरी चत्र दिसतंय. या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यातच मनसेला भाजपचा पाठिंबा असल्याची चर्चा सुरू आहे. यावर विचारले असता भाजपचे नेते गिरीश महाजन म्हणाले की, भाजपचा मनसेला पाठिंबा नाही. त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांचा अजेंडा वेगळा आहे. त्यांची ध्येयधोरणे व विचार सुद्धा वेगळे आहेत. ग्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणीही झाली पाहिजे. मात्र यावर हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असा धर्म भेद न करता किंवा त्यावर राजकारण नको. तो एका साठी आहे तो निर्णय सर्वांसाठी असला पाहिजे, प्रीम कोर्टाने जर निर्णय दिला आहे तर त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे असे म्हणत गिरीश महाजन यांनी एकप्रकारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पाठराखण केली आहे.

राज्यभरातून कार्यकर्ते एकवटले

तर जळगावसह अनेक जिल्ह्यातून कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेला औरंगाबादेत पोहोचले आहेत. जळगाव जिल्ह्यातील तालुका व ग्रामीण भागातून मनसे कार्यकर्ता साईबाबा यांचे दर्शन घेऊन औरंगाबादच्या दिशेने निघाले. आज होणाऱ्या राज ठाकरे यांची सभे साठी जिल्ह्यातून नव्हे तर ग्रामीण भागातून कार्यकर्ता निघाले. या सभेला हजर राहण्यासाठी भुसावळ येथून पदाधिकारी व कार्यकर्ते  वाहनांतून रवाना झाले. जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक यांच्या नेतृत्वात रवाना झालेल्या पदाधिकाऱ्यांना विशेष पास देण्यात आली आहेत. या सभेसाठी पोलिसांनीही तगडा बंदोबस्त लावला आहे.

हे सुद्धा वाचा