AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray: सरकारकडे पाशवी शक्ती असते पण… महात्मा गांधी जयंतीला राज ठाकरे यांची खणखणीत पोस्ट, म्हणाले आता गांधीजींची सर्वाधिक गरज

Raj Thackeray on Mahatma Gandhi: आज 2 ऑक्टोबर, महात्मा गांधी यांची जयंती. आज सकाळीच अनेकांनी बापूंना आदरांजली वाहिली. तर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारपुष्प गुंफले. त्यांनी फेसबुकला एक खणखणीत पोस्ट केली आहे. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Raj Thackeray: सरकारकडे पाशवी शक्ती असते पण... महात्मा गांधी जयंतीला राज ठाकरे यांची खणखणीत पोस्ट, म्हणाले आता गांधीजींची सर्वाधिक गरज
राज ठाकरे, महात्मा गांधीImage Credit source: राज ठाकरे यांच्या फेसबूक वॉलवरून
| Updated on: Oct 02, 2026 | 10:42 AM
Share

Raj Thackeray on Mahatma Gandhi: आज 2 ऑक्टोबर, महात्मा गांधी यांची जयंती आहे. आज सकाळीच दिल्लीत राजघाटवर पंतप्रधान मोदींसह अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर गांधींजीचे स्मरण केले. त्यांनी फेसबुकवर एक खणखणीत पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. महात्मा गांधींच्या विचारांची आज सर्वाधिक गरज असल्याचे त्यांनी पोस्टमधून मत व्यक्त केले आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

सत्ताधाऱ्यांवर राज ठाकरे यांचा अचूक निशाणा

“आज महात्मा गांधीजींची जयंती. खरंतर कुठल्याही महापुरुषाची आठवण फक्त त्याच्या जयंतीला आणि पुण्यतिथीला काढायची, त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करायचा आणि फोटो काढायचे इतक्या पुरतेच आपल्याला महापुरुष आठवतात. स्मारकं म्हणजे पुतळे ही आपली आवडती व्याख्या आणि आता पुतळ्यांच्या सोबत फोटो ही आपली नवीन श्रद्धांजली. असो. पण सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात गांधीजींची आठवण खरंतर अधिक प्रकर्षाने यायला हवी. कारण त्यांनी सत्तेला प्रश्न विचारायला शिकवलं… आणि प्रश्न विचारणं हे सद्य सत्ताधाऱ्यांना आवडत नाही. प्रश्न विचारले की, ते आणि त्यांच्या समर्थकांच्या ‘ ट्रोळ्या ‘ तुम्हाला देशद्रोही ठरवायला आतुरच असतात.” असे परखड मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडले.

आज आंदोलनांकडे संशयाने पाहिलं जातं, आंदोलकांवर बळाचा वापर होतो आणि निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा वेळी गांधीजींची सर्वाधिक गरज आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

तुमच्याकडे पाशवी शक्ती पण…

“गांधीजींनी या देशाला दिलेली सर्वात मोठी गोष्ट कोणती? मला वाटतं—सत्तेला ‘नाही’ म्हणण्याचं सामान्य माणसाचं सामर्थ्य! सरकारकडे कायदा असतो, सत्तेची पाशवी शक्ती असते, सोयीने कायदा बदलण्याची शक्यता असते आणि या कायद्याच्या आधारावर गुन्हेगार ठरवण्याची शक्ती ते स्वतःकडे अबाधित ठेवतात. पण एवढं सगळं असूनही सामान्य माणसाच्या सारासार विचार करण्याच्या क्षमतेवर, त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीवर सरकारची मालकी नसते हे गांधीजींनी दाखवून दिलं. सध्या सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीजच्या काळात या क्षमतेवरच घाला घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे सर्वानी सावध राहायला हवं.” सत्ताधाऱ्यांवर टीका करतानाच त्यांनी समाजालाही जागरूक राहण्याचे आवाहन या निमित्ताने केले आहे.

लोकशाहीसाठी गांधीजींची कायम गरज

लोकशाहीत जनता सार्वभौम असते याची सत्ताधाऱ्यांना अधूनमधून आठवण करून दिली पाहिजे. राजकीय पक्षांची आंदोलनं, मोर्चे आणि त्यातला जनसहभाग हे सर्व सत्ताधाऱ्यांना जाणीव करून देण्याचा मार्ग आहे हे विसरू नये. आणि हेच गांधीजींच्या शिकवणीचं सार आहे. म्हणून गांधीजी सत्ताधाऱ्यांना फक्त श्रद्धांजली पुरते हवे आहेत बाकीचे गांधीजी त्यांच्या सोयीचे नाहीत. पण लोकशाहीला गांधीजी कायम आवश्यक असतात हे आपण विसरता कामा नये, असे राज ठाकरे म्हणाले.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...