मनसैनिकांनी डुप्लिकेट ज्ञानेश कुमारांनाच बांधून आणलं… बोलके पोस्टर, हटके अंदाजाने ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चात भरले रंग

Raj Thackeray Uddhav Thackeray Garjana Morcha: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज गर्जना मोर्चाची हाक दिली आहे. मनसैनिक आणि शिवसैनिकांनी या मोर्चापूर्वीच विविध रंग भरले आहे. त्याची एकूणच जोरदार चर्चा होत आहे.

मनसैनिकांनी डुप्लिकेट ज्ञानेश कुमारांनाच बांधून आणलं... बोलके पोस्टर, हटके अंदाजाने ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चात भरले रंग
राज ठाकरे, उद्धव ठाकरे
| Updated on: Oct 04, 2026 | 11:27 AM

Raj Thackeray Uddhav Thackeray Garjana Morcha: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज गर्जना मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाला मनसैनिक आणि शिवसैनिकांची मोठी गर्दी उसळली आहे. त्यातच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हटके बॅनर, टी शर्ट यांनी लक्ष वेधले आहे. तर ठाणे स्टेशनवरून मनसैनिकांनी चक्क एका डुप्लिकेट ज्ञानेश कुमारांनाच बांधून आणले आहे. मनसैनिक आणि शिवसैनिकांनी या मोर्चापूर्वीच विविध रंग भरले आहे. त्याची एकूणच जोरदार चर्चा होत आहे.

नकली ज्ञानेश कुमारांना बांधून आणले

Loading...

ठाणे स्टेशनवरून नकली ज्ञानेश कुमारांना बांधून आणण्यात आले आहे. लोकलने प्रवास करत पदाधिकाऱ्यांनी त्यामागील कारणही स्पष्ट केले आहे. मनसे अविनाश जाधव कार्यकर्त्यांसोबत उपस्थित आहेत. आज मोर्चा निघणार एवढं निश्चित प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले जात असताना दुख भाजपला का होतय? राज ठाकरे बोलले होते खाई त्याला खवखवे. भाजपने निवडणूक आयोगाचे वकीलपत्र घेतलं आहे. राजीनामा घेतल्याशिवाय विरोधक शांत बसणार नाहीत. मुंबईत पोलीस चांगलं सहकार्य करत आहेत, अशी प्रतिक्रिया अविनाश अभ्यंकर यांनी दिली.

केंद्रीय निवडणुक आयोगाच्या विरोधातला पहिला हा मोर्चा आहे. दोन्ही ठाकरे बंधू याचे नेतृत्व करणार आहे मला वाटतं ही मोठी ऐतिहासिक घटना आहे ईव्हीएम आणि मतचोरी याबद्दल सर्वप्रथम बोलले असेल तर राज ठाकरे बोलले आहेत. काल तरुणांनी ट्रेलर दाखवला आज ठाकरे बंधू पिक्चर महाराष्ट्राला आणि जगला दाखवून देतील. आज रेकॉर्ड ब्रेक ठाकरेंचा मोर्चा होणार आहे

आम्ही गिरगांवकर यांच्याकडून  बोलके पोस्टर

आम्ही गिरगावकर या संस्थेकडून आज ठाकरेंच्या मोर्चे स्थळी वेगवेगळ्या बॅनर लावण्यात आलेले आहे त्यामध्ये ज्ञानेश्वर कुमार यांच्या विरोधामध्ये बॅनर पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश्वर कुमार यांनी पुन्हा एकदा आम्हाला मॅनेज करून सरकार आणून दे मग त्यानंतर आम्ही मराठी लोकांना मुंबईतून बाहेर काढू व हळूहळू मुंबई शाकाहारी करू असा आशय या बॅनर वरती लिहिण्यात आलेला आहे. विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे..

मोर्चास्थळी मोठा पोलीस फौजफाटा

ठाकरे बंधूंचा आज ‘गर्जना’ मोर्चा थोड्याच वेळात निघणार आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांकडून सर्व प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेटींग करण्यात आलेली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत विराट ‘गर्जना’ मोर्चा निघेल. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारातून मोर्चाचे आयोजन केले आहे.

सभास्थळी मंचाची उभारणी

ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चाची तयारी सुरू आहे. ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चाची तयारी सुरू आहे. सीएसटीसमोरील बीएमसी रोडवर ट्रकवर स्टेजची उभारणी सुरू आहे. सीएसटीसमोरील मेट्रो सिनेमाकडे जाणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मेट्रो सिनेमापासून बीएमसी मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार.

डावे, काँग्रेस, राष्ट्रवादीचा सहभाग

मेट्रो सिनेमा चौकात पोलिसांची बॅरिगेटिंग करण्यात आली आहे. पोलिसांचा बंदोबस्त आंदोलनच्या ठिकाणी लावण्यात आला आहे मेट्रो सिनेमा चौक ते मुंबई महानगर पालिके पर्यंत हा पायी चालत आंदोलन होणार आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधूंचं आंदोलन चर्चेच आहे. आजच्या आंदोलनात शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष सामील होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत आयोजित ठाकरे बंधूंच्या मोर्च्यामध्ये काँग्रेस पक्ष प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभागी होणार अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे.

नाशिकमधूनही मोठ्या संख्येने पदाधिकारी मुंबईकडे

ठाकरे बंधूंच्या मुंबईतील मोर्चासाठी नाशिक मधून मनसे पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या विरोधातील मोर्चातही नाशिक मधील मनसैनिक सहभागी होत आहेत. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन करत मुंबईकडे रवाना होत आहेत. शेकडो मनसैनिक मोर्चासाठी मुंबईकडे रवाना होत आहेत.

ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्च्याला थोड्याच वेळात सुरूवात

आता थोड्याच वेळात ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्च्याला सुरूवात होणार आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून मनसैनिक आणि शिवसैनिक या मोर्चासाठी दाखल झाले आहेत .दहा वाजता मोर्चा जिथून निघणार त्या मेट्रो सिनेमाकडे मोठ्या संख्येने नागरीकही पोहचत आहेत. अगदी थोड्याच वेळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी येतील आणि मुंबई महापालिका मुख्यालयाकडे हा मोर्चा निघेल. त्याठिकाणी जाहीर सभा होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us