AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : केवळ ज्ञानेश कुमारच घरी जाणार नाही तर… मोदी-शाह यांचं नाव घेत संजय राऊतांचा मोठा इशारा

Sanjay Raut on Gyanesh Kumar PM Narendra Modi Amit Shah: मुंबईत गर्जना मोर्चा थोड्याच वेळात सुरू होत आहे. त्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

Sanjay Raut : केवळ ज्ञानेश कुमारच घरी जाणार नाही तर... मोदी-शाह यांचं नाव घेत संजय राऊतांचा मोठा इशारा
संजय राऊत, राज ठाकरे, उद्धव ठाकरे
| Updated on: Oct 04, 2026 | 10:39 AM
Share

Uddhav Thackeray Raj Thackeray Garjana Morcha: अगदीच थोड्याच वेळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईत गर्जना मोर्चा सुरू होत आहे. मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा निघेल. त्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. केवळ ज्ञानेश कुमार यांनाच नाही तर मोदी आणि शाह यांनाही घरी जावे लागणार असल्याचा मोठा दावा त्यांनी केला. देशभरात अगदी लहान मुलांनाही देशात काय सुरू आहे, याची कल्पना असल्याचे ते म्हणाले. देशभरात आंदोलनं सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तर 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीत सीजेपी मोठे आंदोलन करणार असल्याचा खुलासाही त्यांनी केला.

राजीव कुमार, ज्ञानेश कुमार हे दोन्ही देशाचे दुश्मन

सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि त्यापूर्वीचे आयुक्त राजीव कुमार हे दोन्ही या देशाचे दुश्मन आहे. त्यांच्यामुळेच भाजप या निवडणुका जिंकल्या. त्यांच्या कार्यकाळातील सर्व निवडणुका रद्द कराव्यात. त्यांच्या कार्यकाळातील लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका रद्द करून नव्याने निवडणुका झाल्या पाहिजेत असे राऊत म्हणाले. महिला पत्रकाराला ज्याप्रकारे त्रास देण्यात आला. तिचा विनयभंग करण्यात आला. देशाचे गृहमंत्री अमित शाह हे अंडरग्राऊंड झालेत का? असा सवाल राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेतून केला.

ही तर सरकारसाठी लाजीरवाणी गोष्ट

शुक्रवारी सीजेपीच्या आंदोलनात एका 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला, त्यावरून भाजप आणि सत्ताधाऱ्यांनी आरोप केला. त्यावर खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. जंतरमंतरवर गोळीबार केला, तेव्हा त्यात एखाद्या आंदोलकांचा मृत्यू झाला असता तर? या आंदोलनात स्वयंस्फुर्तीने तरुण जमले होते ना. मग पूर्णेकरांच्या मृत्यूबाबत काय म्हणाल? ते तर आंदोलनात नव्हते. मग त्यांचा मृत्यू कसा झाला. त्याची जबाबदारी कोण घेणार, मुख्यमंत्री फडणवीस घेणार का, की ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे जबाबदारी घेणार, हा माझा त्यांना प्रश्न आहे, असे राऊत म्हणाले.

मुंबई जवळच्या एका जिल्ह्यातील, शहरातील जनता एकत्र येऊन ते शहर भयमुक्त करावे यासाठी सर्वपक्षीय नेते, नागरीक येत असतील तर ही सरकारसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे, खासकरून फडणवीस यांच्यासाठी, पुण्यानंतर सांस्कृतिक राजधानी म्हणून ठाण्याचे नाव येत होते. ते शहर भयमुक्त करण्यासाठी मोर्चा निघत आहे. जे गुंड आहेत, माफीया, डॉन हे सरकारमध्ये बसलेले आहेत. त्यांना तुम्ही प्रतिष्ठा देत आहेत, असा खणखणीत टोला त्यांनी 9 ऑक्टोबर रोजीच्या ठाण्यातील मोर्चावरून सरकारला लगावला. आमदार संजय केळकर, गणेश नाईक तुम्ही मंत्री असला तरी तुम्ही या मोर्चाचे नेतृत्व करावे असे आवाहन राऊतांनी नाईकांना केले आहे. ठाणेकरांच्या भावनांचा आदर तुम्ही करावा असे राऊत म्हणाले.

Follow Us
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर मुंबईत मोठं आंदोलन
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट...
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट गुन्हा...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?