“विरोधी पक्षातील नेत्यांनी बोलूच नये का..?”; अवमान करणाऱ्या नेत्यांबद्दल राष्ट्रवादीनं स्पष्टच सांगितलं…

| Updated on: Dec 12, 2022 | 11:14 PM

महापुरुषांबद्दल वक्तव्य करून त्यांचा अवमान करणे हे चुकीचे आहे. त्यामुळे अशा महापुरुषांबद्दल बोलताना एक प्रकारची आचारसंहिता असावी असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

विरोधी पक्षातील नेत्यांनी बोलूच नये का..?; अवमान करणाऱ्या नेत्यांबद्दल राष्ट्रवादीनं स्पष्टच सांगितलं...
Follow us on

मुंबईः राज्यात आधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यानंतर भाजपेच राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड, राम कदम त्यानंतर चंद्रकांत पाटील या साऱ्या नेत्यांना महापुरुषांचा अवमान केला. या घटनेनंतर राज्यात शिंदे गटातील नेत्यांसह विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याच प्रकरणी राष्ट्रवादी नेते आणि माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी महापुरुषांबद्दल बोलताना नेत्यांनी भान ठेवले पाहिजे. आणि ज्यांना बोलायचे आहे त्यांना इतिहास जाणून घेऊनच बोलले पाहिजे अशी टीका त्यांनी अवमान करणाऱ्या नेत्यांवर केली आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, महापुरुषांबद्दल बोलताना राज्यात एक आचारसंहिता असणे गरजेचे आहे. मात्र तरीही राजकीय नेत्यांकडून बेताल वक्तव्य केली जात असल्यामुळे ही चुकीची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मागील काही दिवसांपासून महापुरुषांचा अवमान केला जातो आहे मात्र त्याविरोधात बोलू दिले जात नाही. भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.

त्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत हा विषय मांडताना त्यांचा माईक बंद करण्यात आला. त्यामुळे या विषयावर विरोधकांनी बोलायचेच नाही का असा सवालही त्यांनी यावेळी केला.

महापुरुषांबद्दल बोलताना कोणत्याही राजकीय नेत्यांनी आचारसंहिता आणि इतिहास माहिती घेऊनच बोलले पाहिजे असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

महापुरुषांबद्दल वक्तव्य करून त्यांचा अवमान करणे हे चुकीचे आहे. त्यामुळे अशा महापुरुषांबद्दल बोलताना एक प्रकारची आचारसंहिता असावी असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.