शिवशक्ती-भीमशक्ती-भाजपची एकजूट, हीच शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली : रामदास आठवले

| Updated on: Nov 17, 2020 | 1:49 PM

शिवसेना, भाजप आणि आरपीआयची युती पुन्हा व्हावी, अशी आशा रामदास आठवले यांनी व्यक्त केली. (Ramdas Athawale pays tribute to Balasaheb Thackeray)

शिवशक्ती-भीमशक्ती-भाजपची एकजूट, हीच शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली : रामदास आठवले
Follow us on

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिंपाई (अ)चे प्रमुख रामदास आठवले यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन केले आहे. रामदास आठवले यांनी यावेळी रिपांई आणि शिवसेनेच्या युतीच्या आठवणी जागवल्या आहेत. शिवसेना,भाजप आणि रिंपाईची युती तुटल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे. भविष्यात तिन्ही पक्षांनी एकत्र येत पुन्हा एकजूट करणं ही बाळासाहेब ठाकरेंना खरी आदरांजली ठरेल, अशी  भावना आठवलेंनी व्यक्त केली. (Ramdas Athawale pays tribute to Balasaheb Thackeray)

रामदास आठवले यांनी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. “शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन! त्यांच्या स्वप्नातील शिवशक्ती भीमशक्ती भाजप एकजूट आम्ही साकारली. पण, नंतरच्या काळात ती तुटली त्याची खंत वाटते.भविष्यात पुन्हा ती एकजूट उभारावी हीच शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली ठरेल!”, असं ट्विट रामदास आठवले यांनी केलं आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना शिवशक्ती, भीमशक्ती आणि भाजप यांची एकजूट तुटल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. आगामी काळात शिवसेना, भाजप आणि रिंपाईने पुन्हा एकत्र येऊन एकजूट उभारली पाहिजे, ही खरी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.(Ramdas Athawale pays tribute to Balasaheb Thackeray)

शिवसेना 2019 ला महायुतीतून बाहेर

केंद्रात आणि राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना रामदास आठवलेंनी शिवसेनेसोबत युती केली होती. त्यावेळी शिवसेना आणि रिंपाई एकत्र आल्यावर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याचे बोलले जात होते.

भाजप, शिवसेना आणि रिंपाईसह इतर मित्र पक्ष महायुती म्हणून 2019 च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले होते. मात्र, निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजप आणि शिवेसना यांच्यात मुख्यमंत्रिपदावरुन मतभेद वाढले. भाजप आणि शिवसेना वेगवेगळे झाले. उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 ला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि राज्यातून आणि केंद्रातून शिवसेना भाजपची साथ सोडत एनडीएतून बाहेर पडली. मात्र, रामदास आठवले हे सातत्यानं शिवसेना आणि भाजपने पुन्हा एकत्र यावे, अशी भूमिका जाहीरपणे घेत आहेत.

रामदास आठवले चैत्यभूमीवर जाणार

दरम्यान, रामदास आठवले आज दुपारी 2 वाजता चैत्यभूमी येथे जाऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहेत. सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय म्हणजे राज्य सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका रामदास आठवले यांनी यापूर्वी केली होती. मात्र, मंदिरं उघडण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो, असंही आठवले म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या:

फिर एक बार नितीश कुमार…रामदास आठवलेंच्या नितीश कुमारांना खास स्टाईलमध्ये शुभेच्छा

“धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय म्हणजे राज्य सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण”: रामदास आठवले

(Ramdas Athawale pays tribute to Balasaheb Thackeray)