फिर एक बार नितीश कुमार…रामदास आठवलेंच्या नितीश कुमारांना खास स्टाईलमध्ये शुभेच्छा

"फिर एक बार नितीश कुमार.." असं म्हणत आठवले यांनी नितीशकुमार यांना नव्या कार्यकाळासाठी शुभेच्छा देत अभिनंदन केलं आहे. (Ramdas Athawale congratulate Nitish Kumar for taking Oath as Chief Minister of Bihar)

फिर एक बार नितीश कुमार...रामदास आठवलेंच्या नितीश कुमारांना खास स्टाईलमध्ये शुभेच्छा
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 6:35 PM

मुंबई: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या खास स्टाईलमध्ये बिहारचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री नितीश कुमार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.”फिर एक बार नितीश कुमार..” असं म्हणत आठवले यांनी नितीशकुमार यांना नव्या कार्यकाळासाठी शुभेच्छा देत अभिनंदन केलं आहे. रामदास आठवले यांनी नितीश कुमार यांना फोन करुन शुभेच्छा दिल्याची माहिती त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे. (Ramdas Athawale congratulate Nitish Kumar for taking Oath as Chief Minister of Bihar)

रामदास आठवलेंचा आरपीआय (अ) आणि नितीशकुमार यांचा जदयू एनडीएमध्ये एकत्र आहेत. रामदास आठवले यांनी नितीश कुमार यांचं अभिनंदन करताना बिहारच्या वेगवान विकासाची अपेक्षा व्यक्त केली आहे.”मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहारचा विकास आणखी वेगवान होईल, असा विश्वास व्यक्त केला. बिहारमध्ये एनडीएची सत्ता आल्यामुळे भाजपसह मित्रपक्षांच्या आनंदाला उधाण आलं आहे.

जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची सातव्यांदा सूत्रे स्वीकारली. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बिहार भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

नितीशकुमार यांच्यासह जेडीयूकडून विजय कुमार चौधरी, विजेंद्र प्रसाद यादव, अशोक चौधरी, मेवालाल चौधरी आणि शीला कुमारी, भाजपकडून तारकिशोर प्रसाद, रेणू देवी, अमरेंद्र प्रतापसिंह, मंगल पाण्डेय, रामसूरत राय, रामप्रीत पासवान, जीवेश मिश्रा आणि ‘हम’कडून संतोष कुमाल सुमन तसेच मुकेश सहानी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

10 नोव्हेंबर रोजी बिहार निवडणुकीचा निकाल लागला होता. या निवडणुकीत राजदला सर्वाधिक म्हणजे 75 तर भाजपला 74 जागा मिळाल्या होत्या. एनडीएला बिहार निवडणुकीत बहुमत मिळाल्याने अखेर नितीश कुमार यांनी राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा केला होता. त्यानुसार आज नितीश कुमार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह राजभवनात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

बिहारमधील पक्षीय बलाबल

भाजप – 74 जेडीयू – 43 आरजेडी – 75 काँग्रेस – 19 एमआयएम – 05 CPI (ML) – 12 CPI (अन्य) – 4 हिंदुस्तान आवाम मोर्चा – 04 विकासशील इन्सान पार्टी – 04 अपक्ष/इतर – 03 एकूण – 243

संबंधित बातम्या :

“धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय म्हणजे राज्य सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण”: रामदास आठवले

बिहारमध्ये पुन्हा नितीश’राज’!; नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

(Ramdas Athawale congratulate Nitish Kumar for taking Oath as Chief Minister of Bihar)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.