“धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय म्हणजे राज्य सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण”: रामदास आठवले

धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय हे राज्य सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला. (Ramdas Athawale criticize Thackeray govt for delay in religious places reopening )

धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय म्हणजे राज्य सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण: रामदास आठवले
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 5:51 PM

मुंबई : राज्यातील सर्व धार्मिक स्थळं भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. या निर्ण्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप नेत्यांनंतर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी देखील यानिमित्तानं राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय म्हणजे राज्य सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण” असल्याचा आरोप आठवले यांनी केला. (Ramdas Athawale criticize Thackeray govt for delay in religious places reopening )

पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जाहीर केले. रामदास आठवले यांनी राज्य सरकारच्या निर्णयावरुन राज्यावर निशाणा साधला असला तरी स्वागत देखील केलं आहे. “सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय म्हणजे राज्य सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. तरीही या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो”.असं आठवले म्हणाले आहेत.

“सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी रिपाइंने राज्यभर आंदोलन केले होते”, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.  कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळं मार्च महिन्यापासून बंद होती. धार्मिक स्थळं भाविकांना दर्शन घेण्यासाठी खुली करावीत या मागणीसाठी विविध राजकीय पक्षांकडून आंदोलन करण्यात आले होते.

मंदिरं खुली करण्याच्या निर्णयावरुन आरोप प्रत्यारोप 

प्रवीण दरेकरांनी ठाकरे सरकारला मंदिर उघडण्याच्या निर्णयावरुन खडे बोल सुनावले. या सरकारनं हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. मात्र केवळ भाजप आंदोलकांना, पुजाऱ्यांना वारकऱ्यांना सपोर्ट करते. म्हणून अहंकारातून त्यांना मदत करायची नाही, या इगोपोटी हा निर्णय रखडवला होता, अशी टीकाही प्रवीण दरेकरांनी केली आहे.

भाजप नेत्यांच्या आरोपाला महाविकासआघाडीतील नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देत राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन करण्यात आले.  कोरोनाचा धोका असतानाही राज्यातील मंदिरे सुरु करण्यासाठी भाजपकडून मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणला जात होता. मात्र, या दबावाला उद्धव ठाकरे बळी पडले नाहीत. वेळ आल्यावर टप्याटप्याने मी सर्वकाही सुरु करेन, हा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळला. याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने उद्धव ठाकरे यांचे आभार मानत असल्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगतिले.

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धार्मिक स्थळं उघडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक केले आहे. “मंदिरं उघडायला उशीर झाला आहे, असं विरोधक म्हणत असतील पण तसं म्हणता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी योग्य वेळी मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतलाय, कोरोना काळात जनतेचा विचार करुन निर्णय घ्यावे लागतात”,असा टोला जयंत पाटील यांनी विरोधकांना लगावला.

संबंधित बातम्या : 

मंदिरं उघडण्याची ‘हीच ती वेळ’, सरकार पुढील चार वर्ष दिवाळी साजरी करणार : जयंत पाटील

राज्यपालांविषयी महाविकासआघाडीचे मत दुराग्रही, अधिकारात, नियमात जे असेल तेच राज्यपाल करतील : प्रवीण दरेकर

(Ramdas Athawale criticize Thackeray govt for delay in temple reopening )

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.