Rashmi Thackeray Corona : मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल

| Updated on: Mar 30, 2021 | 11:28 PM

23 मार्च रोजी रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आज त्यांनी दक्षिण मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Rashmi Thackeray Corona : मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल
रश्मी ठाकरे
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना उपचारासाठी HN रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 23 मार्च रोजी रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आज त्यांनी दक्षिण मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रश्मी ठाकरे यांना रुटीन तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. पण आता त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं सांगितलं जात आहे.(Rashmi Thackeray admitted to HN Reliance Hospital)

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आदित्य ठाकरे यांनी स्वत:च ट्विटरवरुन ही माहिती दिली होती. त्यानंतर रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरच त्यांनी स्वत: क्वारंटाईन करुन घेतलं होतं. त्यानंतर आत रश्मी ठाकरे यांनी HN रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महत्वाची बाब म्हणजे 11 मार्च रोजी रश्मी ठाकरे यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.

आदित्य ठाकरेंनाही कोरोना

ज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य यांनी स्वत: 20 मार्च रोजी ट्विटरवर याबाबत माहिती दिली होती. “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या”, असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं होतं.

संबंधित बातम्या : 

मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

Rashmi Thackeray admitted to HN Reliance Hospital