सारस्वत बँकेच्या नवी मुंबईतील शाखेत दिवसाढवळ्या दरोडा, दरोडेखोर फरार

| Updated on: Jul 17, 2020 | 12:25 AM

सारस्वत बँकेच्या कोपरखैरणे येथील शाखेवर दरोडा पडल्याची घटना गुरुवारी (16 जुलै) दुपारी घडली आहे (Robbery at Saraswat Bank Koparkhairane branch).

सारस्वत बँकेच्या नवी मुंबईतील शाखेत दिवसाढवळ्या दरोडा, दरोडेखोर फरार
Follow us on

नवी मुंबई : सारस्वत बँकेच्या कोपरखैरणे येथील शाखेवर दरोडा पडल्याची घटना गुरुवारी (16 जुलै) दुपारी घडली आहे. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली (Robbery at Saraswat Bank Koparkhairane branch).

कोपरखैरणे सेक्टर 19 येथील सारस्वत बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला. दुपारच्या सुमारास बँकेत 6 ते 7 कर्मचारी उपस्थित होते. बँकेत आलेल्या दोघा व्यक्तींनी चाकूच्या धाकावर लॉकरमधील सुमारे साडेचार लाखाची रोकड पळवली. या घटनेनंतर बँक कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

बँकेत आलेले दोघेही 30 ते 35 वयोगटातील होते. शिवाय तोंडाला मास्क लावलेले होते. तर हाताचे ठसे उमटू नयेत याकरिता हातात ग्लोज घातले होते. बँकेत आलेल्या दोघांनी एका कर्मचाऱ्याला चाकूच्या धाकावर धरले. त्यानंतर लॉकर रुम उघडायला लावून त्यामधील सुमारे साडेचार लाख रुपये लुटून पळ काढला.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरात तसेच कोपरखैरणे परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आलेला असताना दोघा लुटारुंनी बँक लुटल्यानंतर शहराबाहेर पळ काढला कसा, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.