“राज ठाकरे जातपात मानत नाही, मग दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी नाव देण्यास विरोध का केला?”

| Updated on: Aug 21, 2021 | 7:54 AM

राज ठाकरे जातपात मानत नाहीत ही चांगली गोष्ट आहे, पण मग त्यांनी मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी नाव देण्यास विरोध का केला? असा सवाल सचिन खरात यांनी केलाय.

राज ठाकरे जातपात मानत नाही, मग दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी नाव देण्यास विरोध का केला?
Follow us on

मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या जातीपातीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. राज ठाकरे जातपात मानत नाहीत ही चांगली गोष्ट आहे, पण मग त्यांनी मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी नाव देण्यास विरोध का केला? असा सवाल सचिन खरात यांनी केलाय.

सचिन खरात म्हणाले, “राज ठाकरे जातपात मानत नाही ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्यांनी मुंबई येथील दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी नाव देण्यास विरोध का केला? त्यांनी या प्रश्नाचं उत्तर रयतचे राजे शिवाजीमहाराज, संभाजीराजे आणि फुले, शाहू, आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्राला जाहीरपणे सांगावे.”

“राज ठाकरेंनी बाबासाहेब आंबेडकरांचं ‘एनिहिलेशन ऑफ कास्ट’ पुस्तक वाचावं”

“राज ठाकरे यांना वेळ मिळाला तर त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘एनिहिलेशन ऑफ कास्ट’ हे पुस्तक वाचावे,” असा सल्लाही सचिन खरात यांनी दिला.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

अजूनही आपण जातीपातीमध्ये खितपत पडलो आहोत. स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही निवडणुकीत भाषणं होतात तेव्हा सगळ्यांकडून सारखं रस्ते, पाणी, विज अशी तिच तिच आश्वासनं दिली जात आहेत. तेव्हा एवढ्या वर्षात आपण काय केलं हे शोधलं पाहिजे. साधारणपणे आपण 99 साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 99 नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले.

‘बाबासाहेबांना ब्राह्मण किंवा पवारांना मराठा म्हणून भेटत नाही’

बाबासाहेब पुरंदरेंना मी इतिहास संशोधक म्हणून जातो, ब्राह्मण म्हणून नाही. पवारसाहेबांकडे मी मराठा म्हणून जात नाही. कुणाच्याही घरी आपण जात म्हणून जातो का? वॉर्डनिहाय आरक्षणापेक्षा स्त्री पुरुष हेच आरक्षण असलं पाहिजे. विरोध काय करणार, वरती जे ठरवात तेच करावं लागतं. अजून तुमचं नशीब तुमच्या क्षेत्रात मीडियात अजून आरक्षण नाही. मी काय वाचतो आणि काय वाचलंय हे मला माहितीय, माझ्या पक्षाला माहितीय, मला मोजायचा प्रयत्न करु नये. बाबासाहेबांनी चुकीचा इतिहास लिहिला म्हणता, पण सिद्ध करा ना.. ५० साली पहिलं पुस्तक आलं त्यावेळी तुम्हाला चुकीचा इतिहास कळला नाही का? ज्याचं काही आकलन नाही, त्याच्यावर काय बोलायचं? कोण जेम्स लेन? कुठे आहे सध्या? आग लावायला आला, त्याच वेळी का आला? हे सर्व वेल डिझाईन्ड आहे, असा गंभीर आरोपही राज यांनी यावेळी केलाय.

हेही वाचा :

राज ठाकरेंच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचं पुन्हा एकदा प्रत्युत्तर, राज यांच्यावर थेट ‘राष्ट्रद्रोहा’चा आरोप!

शरद पवार भाषणाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या नावानं का करत नाहीत? राज ठाकरेंचा सवाल

पुरंदरे ते प्रबोधनकार, शरद पवार ते संभाजी ब्रिगेड, राज ठाकरेंचे 10 मोठे मुद्दे

व्हिडीओ पाहा :

RPI Sachin Kharat question Raj Thackeray stand on caste and Dadar station Chaityabhumi