ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दादरमध्ये शिंदेंचे शिलेदार ठरले, एकाच घरात दोघांना उमेदवारी, पाहा संपूर्ण यादी

नुकत्याच झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंयाचत निवडणुकीत भाजपपाठोपाठ एकनाथ शिंदे गटाने जबरदस्त कामगिरी केली. त्यांचे 61 नगराध्यक्ष निवडून आणले. आता महापालिका निवडणुकीत तोच सिलसिला कायम ठेवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे.

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दादरमध्ये शिंदेंचे शिलेदार ठरले, एकाच घरात दोघांना उमेदवारी, पाहा संपूर्ण यादी
Eknath Shinde
| Updated on: Dec 29, 2025 | 2:22 PM

काही वर्षांपूर्वी सगळी मुंबईच शिवसेनेचा बालेकिल्ला होती. महापालिका निवडणुकीत प्रत्येक वॉर्डातून शिवसेनेचे उमेदवार सहज निवडणूक जिंकायचे. पण मागच्या 15 वर्षात मुंबईच चित्र बदललं. नारायण राणे आणि राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक पालिका निवडणूक चुरशीची होऊ लागली. मागच्या 15 वर्षात शिवसेनेला महापालिकेत सत्तेसाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागली आहे. यंदाच्या पालिका निवडणुकीत चित्र काय असेल? याचा अंदाजही कोणाला बांधता येणार नाही. कारण 2022 मध्ये शिवसेना पक्षात दोन गट पडले. आज अधिकृत शिवसेना आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह मिळालं आहे. मागच्यावर्षी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने चांगली कामगिरी केली होती. पण त्यानंतर सहा महिन्यातच विधानसभा निवडणुकीत खूप खराब कामगिरी उद्धव ठाकरे गटाने केली.

उद्धव ठाकरे गटाचे फक्त 20 आमदार राज्यभरातून निवडून आले. त्या उलट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज्यभरातून 57 आमदार निवडून आले. नुकत्याच झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंयाचत निवडणुकीत भाजप पाठोपाठ एकनाथ शिंदे गटाने जबरदस्त कामगिरी केली. त्यांचे 61 नगराध्यक्ष निवडून आणले. आता महापालिका निवडणुकीत तोच सिलसिला कायम ठेवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. कालपासून राजकीय पक्षांनी एबी फॉर्म वाटपं सुरु केलय. भाजप, उद्धव ठाकरे गटाने त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार यादीचं काय? असा प्रश्न विचारला जातोय.

ते चार उमेदवार कोण?

दरम्यान दादर-माहीम विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सहा पैकी चार जागा सुटल्या आहेत.

182 वॉर्ड – मिलिंद तांडेल

191 वॉर्ड – प्रिया सरवणकर गुरव

192 – कुणाल वाडेकर

194 – समाधान सरवणकर

एकनाथ शिंदे शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे

प्रिया सरवणकर गुरव आणि समाधान सरवणकर ही दोन्ही माजी आमदार सदा सरवणकर यांची मुलं आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रभादेवी विधानसभा मतदारसंघातून सदा सरवणकर यांचा पराभव झाला होता. आता त्यांच्या दोन मुलांना उमेदवारी मिळाली आहे. इथे एकनाथ शिंदे शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेना असा सामना रंगणार आहे.