हिंमत असेल तर अमेय खोपकरला अटक करून दाखवा; मनसे आक्रमक

| Updated on: Feb 26, 2021 | 3:09 PM

मराठी भाषा दिनानिमित्ताने मनसेचे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कात 'मराठी स्वाक्षरी' मोहीम आयोजित केली होती. (sandeep deshpande slams maha vikas aghadi over marathi bhasha din)

हिंमत असेल तर अमेय खोपकरला अटक करून दाखवा; मनसे आक्रमक
संदीप देशपांडे, मनसे नेते
Follow us on

मुंबई: मराठी भाषा दिनानिमित्ताने मनसेचे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कात ‘मराठी स्वाक्षरी’ मोहीम आयोजित केली होती. त्याला शिवाजी पार्क पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तर खोपकर यांनी कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रम करणारच असा पवित्रा घेतला आहे. पोलिसांनी खोपकर यांना नोटीस बजावल्याने मनसेही आक्रमक झाली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तर हिंमत असेल तर अमेय खोपकरला अटक करून दाखवाच, असा इशाराच दिला आहे. (sandeep deshpande slams maha vikas aghadi over marathi bhasha din)

संदीप देशपांडे यांनी ट्विट करून हा इशारा दिला आहे. हिंमत असेल तर अमेय खोपकर यांना अटक करून दाखवाच असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर अमेय खोपकर यांनीही ट्विट करून पोलिसांच्या आलेल्या नोटीसवर संताप व्यक्त केला आहे.

खोपकर यांचा संताप

कोविड प्रसार होऊ नये म्हणून राज्य सरकारने जी नियमावली आखून दिली आहे. त्या नियमांचे काटेकोर पालन करून मनसेने मराठी भाषा दिन कार्यक्रम आयोजित केला होता. सरकारने या कार्यक्रमाला कोविड प्रसाराचं कारण देत परवानगी तर नाकारलीच वर कारवाईचा धाक दाखवला आहे, असं खोपकर यांनी म्हटलं आहे.

सरकारच ‘अमराठी’ आहे काय? आम्ही कार्यक्रम घेणारच

ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. अशा संजय राठोड सारख्या मंत्र्यांचे समर्थक लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करतात, अशा गर्दीवर कारवाई करण्याची यांच्यात धमक नाही. त्यांच्या डोळ्यात मराठी भाषा दिन का खुपतो? यातून महाबिघाडीचं डोकं ठिकाणावर नाही यावर शिक्कामोर्तबच झालंय, पण त्यापुढे जाऊन आता शंका यायला लागली आहे की सरकारच ‘अमराठी’ आहे काय? आम्ही ठणकावून सांगतो की, नियोजित कार्यक्रम आम्ही सर्व नियम पाळून करणार म्हणजे करणारच, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

काय आहे प्रकरण

खोपकर यांनी मराठी भाषा दिनानिमित्त उद्या शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज पार्कात ‘मराठी स्वाक्षरी’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी त्यांनी महापालिका आणि मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली होती. परंतु, राज्यात सुरू असलेल्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असून कार्यक्रम आयोजित केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिबंधात्मक नोटीस खोपकर यांना बजावली आहे. त्यामुळे खोपकर संतापले आहेत. (sandeep deshpande slams maha vikas aghadi over marathi bhasha din)

 

संबंधित बातम्या:

मराठी राजभाषा दिनाला राज ठाकरेंचं महाराष्ट्राला विनम्र आवाहन, वाचा त्यांचं पत्र जसंच्या तसं !

मुंबई लोकलमध्ये पठ्ठ्या मास्क डोळ्यावर लावून झोपला, महाराष्ट्राचे मंत्री म्हणाले, कोरोनाची काय चूक?

संजय राठोडांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही, भाजप आक्रमक

(sandeep deshpande slams maha vikas aghadi over marathi bhasha din)