मुंबई लोकलमध्ये पठ्ठ्या मास्क डोळ्यावर लावून झोपला, महाराष्ट्राचे मंत्री म्हणाले, कोरोनाची काय चूक?

मुंबई लोकलमध्ये पठ्ठ्या मास्क डोळ्यावर लावून झोपला, महाराष्ट्राचे मंत्री म्हणाले, कोरोनाची काय चूक?
मुंबई लोकलमध्ये मास्क डोळ्यावर ठेवून प्रवास करणारा प्रवासी

राज्यात मास्क घालणे (face mask) बंधनकारक करण्यात आलं आहे. ठिकठिकाणी आर्थिक दंड ठोठावला जात आहे. पण तरीही अनेक लोक नाकाच्या खाली, हनुवटीवर मास्क ठेवतात.

सचिन पाटील

|

Feb 26, 2021 | 2:36 PM

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या (Maharashtra corona update) पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. प्रशासनाकडून आवश्यकती खबरदारी घेतली जात आहे. अमरावती, जालना, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यात रुग्णवाढीचा वेग जास्त आहे. शिवाय मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्येही कोरोनाचा संसर्ग पसरत आहे. मात्र लोक अजूनही मास्कबाबत गंभीर नसल्याचं चित्र आहे. राज्यात मास्क घालणे (face mask) बंधनकारक करण्यात आलं आहे. ठिकठिकाणी आर्थिक दंड ठोठावला जात आहे. पण तरीही अनेक लोक नाकाच्या खाली, हनुवटीवर मास्क ठेवतात.

मुंबई लोकलमध्ये तर एका पठ्ठ्याने मास्क चक्क डोळ्यावर ठेवून झोपी गेला. हाच फोटो कुणीतरी प्रवाशाने काढला. तो फोटो आता व्हायरल होत आहे. हा फोटो युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ट्विट केला. काय चूक आहे त्या बिचाऱ्या कोरोना व्हायरसची ? असं म्हणत सत्यजीत तांबेनी फोटो शेअर केला. मग तांबेंचं हे ट्विट मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रिट्विट केलं. “मित्रांनो असं बेजबाबदार वागू नका!, मास्कचा योग्य वापर करा , कमीत कमी स्वतः च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकरिता”, असं कॅप्शन वडेट्टीवारांनी लिहिलं.

लॉकडाऊन परवडणारे नाही – वडेट्टीवार

राज्यातील वाढत्या कोरोना आकडेवारीवर राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली असून महाराष्ट्र सरकार वाढती आकडेवारीची स्थिती गांभीर्यानं घेत असल्याचे म्हटले आहे. राज्याला आणि एकूण अर्थकारणाला लॉकडाऊन परवडणारे नाही असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. मात्र लॉकडाऊन टाळण्यासाठी लोकलच्या फेऱ्या कमी करणे, एसटी बसेस मधील गर्दी कमी करणे आदी शक्यतांची पडताळणी केली जात असल्याचे ते म्हणाले. सिनेमागृहे- मंगल कार्यालयात होणाऱ्या गर्दीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. महत्वाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे आणि ऑनलाईन परीक्षा घेणे याबाबतही चाचपणी सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. येत्या काळात हे निर्णय अपेक्षित असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

संबंधित बातम्या 

Special Report | ….म्हणून अर्धा महाराष्ट्र मास्क घालत नाही?

man keeps mask on eyes while traviling in Mumbai local

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें