संजय राठोडांची गाडी मंत्रालयाच्या पार्किंगमध्येच उभी, मीडियाशी बोलू नका; शिवसेना नेत्यांना तंबी

| Updated on: Feb 13, 2021 | 2:00 PM

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने वन मंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून राठोड नॉट रिचेबल आहेत. (sanjay rathod not reachable, car in mantralaya parking lot)

संजय राठोडांची गाडी मंत्रालयाच्या पार्किंगमध्येच उभी, मीडियाशी बोलू नका; शिवसेना नेत्यांना तंबी
पूजाला न्याय मिळवून देण्यासाठी बंजारा समाजाने रस्त्यावर उतरावे, असे आवाहन शेतकरी नेते आणि विमुक्त घुमंतू जनजाती महासभा प्रदेशाध्यक्ष मनीष जाधव यांनी बंजारा समाजाला केले होते.
Follow us on

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने वन मंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून राठोड नॉट रिचेबल आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राठोड यांची गाडी मंत्रालयाच्या पार्किंगमध्येच असल्याने राठोड गेले कुठे? असा सवाल केला जात आहे. तर, दुसरीकडे राठोड प्रकरणी मीडियाला प्रतिक्रिया न देण्याचे आदेश शिवसेना नेत्यांना शिवसेनेतून देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. (sanjay rathod not reachable, car in mantralaya parking lot)

पूजा चव्हाण या तरुणीने रविवार 7 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. त्यानंतर आघाडी सरकारमधील मंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्याच्या कथित संभाषणाच्या 11 क्लिप व्हायरल झाल्या. त्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट वन मंत्री संजय राठोड यांच्यावरच आरोप करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. राठोड यांच्या मुसक्या आवळा आणि त्यांच्यावर सखोल मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही त्यांनी केली.

राठोड अज्ञातवासात?

चित्रा वाघ यांच्या थेट आरोपानंतर प्रसारमाध्यमांनी राठोड यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण गेल्या तीन दिवसांपासून ते नॉट रिचेबल आहेत. तसेच गेल्या दोन दिवसांपासून त्यांची गाडी (MH 01DP 7585) मंत्रालयाच्या प्रांगणात उभी आहे. त्यामुळे राठोड गाडी सोडून अज्ञातवासात कुठे निघून गेले? असा सवाल केला जात आहे.

यवतमाळमध्ये शुकशुकाट

राठोड हे यवतमाळमध्ये राहतात. यवतमाळमध्ये त्यांचा प्रशस्त बंगला आहे. हा बंगला नेहमी गजबलेला असतो. बंगल्यात सतत कार्यकर्त्यांची वर्दळ असते. पण पूजा चव्हाण प्रकरण मीडियात आल्यापासून या बंगल्यातील वर्दळ अचानक गायब झाली असून बंगल्यात शुकशुकाट पसरला आहे.

शिवसेनेची नेत्यांना तंबी

दरम्यान, संजय राठोड यांच्या प्रकरणामुळे शिवसेनेची प्रचंड कोंडी झाली आहे. या प्रकरणी शिवसेना नेत्यांना प्रतिक्रिया विचारल्या जात आहेत. त्यातच राठोड यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यांची बाजू मांडलेली नाही. त्यामुळे काय प्रतिक्रिया द्यावी हा शिवसेना नेत्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मीडियासमोर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका, अशी तंबीच शिवसेनेकडून नेत्यांना देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. (sanjay rathod not reachable, car in mantralaya parking lot)

संबंधित बातम्या:

Pooja Chavan Suicide Case Live Updates : संजय राठोड यांची गाडी दोन दिवसांपासून मंत्रालयाच्या कार पार्किंगमध्येच उभी

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ‘वर्षा’वर?; मुख्यमंत्र्यांना दिला पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाचा रिपोर्ट!

पूजा चव्हाण आत्महत्या ते भाजपकडून संजय राठोडांचं थेट नाव; आतापर्यंत काय काय घडलं?

(sanjay rathod not reachable, car in mantralaya parking lot)