Pooja Chavan Suicide Case Live Updates : कोणावरही अन्याय होणार नाही, सत्य बाहेर येईल : मुख्यमंत्री

| Updated on: Feb 14, 2021 | 12:04 AM

पूजा राठोड आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेत भाजपने आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली आहे.| Pooja Chavan Suicide Case Live Updates

Pooja Chavan Suicide Case Live Updates : कोणावरही अन्याय होणार नाही, सत्य बाहेर येईल : मुख्यमंत्री
संजय राठोड वर्षा बंगल्यावर गेले तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका बैठकीत व्यग्र होते. त्यामुळे संजय राठोड यांना बराच काळ वाट पाहावी लागली.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्राचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात दिवसभरात काय काय घडत आहे, त्याचे प्रत्येक अपडेट लाईव्ह | Pooja Chavan Suicide Case Live Updates

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Feb 2021 06:37 PM (IST)

    संजय राठोडांवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

    याबद्दल सखोल चौकशी केली जाईल, पण गेले काही दिवस, काही महिने काहीवेळेला असं आपल्या लक्षात आलेलं आहे, एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जातो, तर असंही होता कामा नये आणि त्याचबरोबर सत्य लपवण्याचाही प्रयत्न होता कामा नये. सत्य लपवण्याचा प्रयत्न होणार नाही, याच्यामध्ये जे काही सत्य असेल ते चौकशीनंतर जनतेसमोर येईल

  • 13 Feb 2021 06:07 PM (IST)

    बंजारा समितीच्या बैठकीत ठरलं, सेवालाल जयंतीला मुख्यमंत्र्यांना भेटणार

    यवतमाळ बंजारा समन्वय समितीची बैठक संपली, या बैठकीत संजय राठोड यांच्यावर राजकीय आरोप करण्यात येत असल्याबाबत चर्चा, आजच्या बैठकीत ठरलं आहे की या संदर्भात मुख्यमंत्र्यांना मेलद्वारे निवेदन पाठविलं जाईल, 15 तारखेला सेवालाल महाराज जयंतीनंतर प्रत्यक्ष निवेदन देण्यात येईल आणि या विरोधात आंदोलन करण्याचीसुद्धा तयारी

  • 13 Feb 2021 04:55 PM (IST)

    Pooja Chavan Case | राष्ट्रीय महिला आयोगाचं पोलीस महासंचालकांना पत्र, कारवाईचा अहवाल मागवला

    राष्ट्रीय महिला आयोगाकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. महिला आयोगाने याबाबत एक प्रसिद्धिपत्रक जारी केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, राष्ट्रीय महिला आयोगाला एका ट्विटमध्ये टॅग करुन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली आहे. आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी याबाबत योग्य कारवाई व्हावी, यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. तसेच आयोगाने यासंदर्भात लवकरात लवकर सखोल कारवाईचा अहवालही मागविला आहे. या पत्राची एक प्रत पुणे पूर्व विभागाच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांनाही (East Region, Pune,) पाठवली आहे.

  • 13 Feb 2021 03:40 PM (IST)

    "अण्णांच्या आरोपानंतर बाळासाहेबांनी मंत्र्यांचे राजीनामे घेतले, तोच ठाकरी बाणा उद्धव ठाकरेंनी दाखवावा"

    मुख्यमंत्र्यांनी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी ठाकरी बाणा दाखवावा. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांची मागणी. शिवशाही सरकार असताना अण्णा हजारे यांनी अनेक मंत्र्यावर आरोप केले त्यांचे बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामे घेतले होते, तोच ठाकरीबाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवावा, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

  • 13 Feb 2021 02:29 PM (IST)

    उद्धव ठाकरे न्याय देणार का, चंद्रकांत पाटील यांचा सवाल

    पूजा चव्हाणची आत्महत्या प्रकरणात उद्धव ठाकरे न्याय देणार का,  अशा प्रश्नावर नेहमीच न्याय भूमिका घेणारे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव तसेच महिलांचा सन्मान करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या वाटेवर आपण चालतो असे सांगणारे उद्धव ठाकरे ते पूजा चव्हाण ला न्याय देणार का - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सवाल

  • 13 Feb 2021 01:14 PM (IST)

    संजय राठोड यांची गाडी दोन दिवसांपासून मंत्रालयाच्या कार पार्किंगमध्येच उभी

    पूजा चव्हाण आत्महत्ये प्रकरणी विरोधकांनी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली असताना, संजय राठोड हे गेले दोन दिवस त्यांची गाडी (MH 01DP 7585) मंत्रालयाच्या प्रांगणात ठेऊन अज्ञातवासात गेले आहेत. संजय राठोड हे नॉट रिचेबल आहेत. मात्र त्यांची गाडी दोन दिवसांपासून मंत्रालयाच्या कार पार्किंगमध्येच उभी आहे

  • 13 Feb 2021 01:05 PM (IST)

    डोक्याला मार लागून पूजा चव्हाणचा मृत्यू, पोस्टमॉर्टम रिपोर्ट

    पुणे : राज्यभर चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. पुणे पोलिसांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांना राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पाचारण केलं. दीपक लगड यांच्याकडून हेमंत नगराळे यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. पूजा चव्हाण या तरुणीचा मृत्यू डोक्याला मार लागून झाल्याचा पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये उल्लेख असल्याची माहिती दीपक लगड यांनी हेमंत नगराळे यांना दिली.

  • 13 Feb 2021 12:13 PM (IST)

    ... तर राम कदमांपर्यंत जावं लागेल, संजय राठोड प्रकरणावर काँग्रेसची प्रतिक्रिया

    काँग्रेस नेते आणि पशूसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना प्रश्न, संजय राठोड यांच्यासोबत काँग्रेस आहे का?, या प्रश्नावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांनी बोलणं टाळलं, या सर्व विषयावर मुख्यमंत्री बोलतील म्हणून बोलणं टाळलं. सुनील केदार हे नागपुरात होते. त्यांनी बर्ड फ्लूसंदर्भात माहिती दिली. मात्र पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात भाजपने आरोप केलेले मंत्री संजय राठोड यांच्याबाबत त्यांना विचारलं असता, सुनील केदार यांनी बोलणं टाळलं

    मात्र सुनील केदार यांना भाजपच्या प्रतिक्रेवर विचारलं असता ते म्हणाले, " संजय राठोड विषयावर पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य नाही, मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, ते या विषयावर बोलतील, विरोधी पक्षाचं टीका करणे काम आहे, विरोधी पक्षाने विरोध करावा, विरोधी पक्षाने फक्त टीका करुन चालणार नाही, भाजपने समजा राजकारणच करतो म्हटलं तर दूरपर्यंत जावं लागेल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर किंवा राम कदम यांच्यापर्यंत जावं लागेल. पण मला राजकारण करायचं नाही", असं सुनील केदार म्हणाले.

  • 13 Feb 2021 11:44 AM (IST)

    राज्यात आज दुपारी 3 वाजता बंजारा समाज समानव्य समिती बैठक

    यवतमाळ : बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे वनमंत्री संजय राठोड यांच्या माध्यमातून समस्त बंजारा समाजाला लक्ष केले जातेय त्यामुळे आज राज्यात आज दुपारी 3 वाजता बंजारा समाज समानव्य समिती बैठक प्रत्येक जिल्ह्यात बोलावली आहे ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात ही बैठक होत आहे असं या समितीच्या नेत्यांचे म्हणणं आहे

  • 13 Feb 2021 11:44 AM (IST)

    पूजा चव्हाण प्रकरणाची सखोल चौकशी करा, भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं ट्विट

  • 13 Feb 2021 11:42 AM (IST)

    संजय राठोड यांची हकालपट्टी करा, पूजा चव्हाण प्रकरणावरुन अतुल भातखळकर आक्रमक

  • 13 Feb 2021 11:40 AM (IST)

    पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणे योग्य नाही : एकनाथ शिंदे

Published On - Feb 13,2021 7:00 PM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.