एक नंबरचा येडXX… गोरे विरुद्ध राऊत ‘सामना’ पेटला; भडका आणि संताप

मंत्री जयकुमार गोरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील राजकीय वाद विकोपाला गेला आहे. या वादात राऊतांनी गोरेंना शिवीगाळ केली, तर गोरेंनी त्यांना ओळखण्यास नकार दिला. यामुळे हा संघर्ष आणखीनच पेटला असून, दोन्ही नेते एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत. या राजकीय संघर्षाचे पुढे काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एक नंबरचा येडXX... गोरे विरुद्ध राऊत सामना पेटला; भडका आणि संताप
Sanjay Raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 03, 2026 | 5:48 PM

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. शिवीगाळीवर प्रकरण येईल इथपर्यंत हा वाद गेला आहे. राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना गोरेंना शिवी हासडली. तर, त्यावर गोरे यांनी कोण राऊत? मी ओळखत नाही, असं म्हणत राऊतांचा पाणउतारा केला. त्यावरून राऊत यांनी पुन्हा एकदा गोरेंवर हल्ला चढवला आहे. मला ओळखूही नये आणि माझ्या नादाला लागूही नये, असा इशाराच राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे आता गोरे त्यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, गोरे विरुद्ध राऊत हा सामना येत्या काळात अधिकच रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

वाद कसा सुरू झाला?

जंतरमंतरवरचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अभिजीत दीपके छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या घरी आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अभिजीत दीपकेंशी फोन करून त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला होता. त्याबाबत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना विचारण्यात आलं होतं. त्यावेळी गोरे यांनी उद्धव ठाकरे आगामी निवडणूक अभिजीत दीपकेंच्या नेतृत्वात लढतील, अशी खोचक टीका केली होती.

राऊत भडकले

गोरे यांच्या या विधानामुळे राऊत चांगलेच भडकले होते. राऊत यांना गोरेंच्या विधानाबाबत विचारताच राऊतांनी शिवी हासडली होती. गोरे येडXX आहे तो. काय आहे? अभिजीत दीपकेने तुमच्या पंतप्रधानांना गुडघे टेकायला लावले. दीपकेंमुळे अमित शाह आणि पंतप्रधान बिळात दडून बसले आहेत. दीपकेला सर्वात आधी आम्ही पाठिंबा दिला. तुम्ही सातारचे प्रतिनिधीत्व करत आहात. काही तरी भान ठेवा, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला होता.

कोण राऊत?

त्यानंतर काल गोरे यांना मीडियाने राऊतांच्या शिवीगाळीबद्दल विचारले. तेव्हा गोरे यांनी कोण राऊत? असा सवाल केला. मी संजय राऊत यांना ओळखत नाही. संजय राऊत कोण आहेत? अशा शब्दांत त्यांनी राऊतांच्या शिवराळ भाषेला उडवून लावलं होतं.

राऊत पुन्हा भडकले

गोरे यांच्या या प्रतिक्रियेबद्दल राऊत यांना आज पुन्हा विचारण्यात आलं. त्यावर राऊत यांनी पुन्हा एकदा गोरेंना टार्गेट केलं. त्यांनी मला ओळखूही नये. माझ्या आसपासही फिरू नये. त्यांना त्रास होईल, असं म्हणत राऊत यांनी गोरे यांना पुन्हा लक्ष्य केलं आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आगपाखड सुरू केल्याने हा वाद अधिक चिघळला आहे. आता हा वाद आणखी पेटणार की शांत होणार हे येत्या काही दिवसात दिसून येईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us