AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दावोसमध्ये रोड शो करणार आहेत का?, हे राजकारणाचे धंदे बंद करा; संजय राऊत यांनी योगींना फटकारले

तुम्हाला रोडशोची गरज काय? तुम्ही उद्योगपतींशी चर्चा करायला आला आहात. तुम्ही तुमच्या राज्याच्या विकासासाठी मुंबईचं योगदान घ्यायाल आला आहात तर रोड शो कशासाठी? असा सवालही त्यांनी केला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दावोसमध्ये रोड शो करणार आहेत का?, हे राजकारणाचे धंदे बंद करा; संजय राऊत यांनी योगींना फटकारले
हे राजकारणाचे धंदे बंद करा; संजय राऊत यांनी योगींना फटकारलेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 05, 2023 | 10:22 AM
Share

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबईत ते अनेक उद्योगपतींशी चर्चा करून उत्तर प्रदेशात गुंतवणूक नेणार आहेत. तसेच ते ताज हॉटेलबाहेर रोडशोही करणार आहेत. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना फटकारले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दावोसमध्ये रोड शो करणार आहेत का? मग योगी आदित्यनाथ मुंबईत रोड शो का करत आहेत?, असा सवाल करतानाच हे राजकारणाचे धंदे सोडून द्या, अशा शब्दात संजय राऊत यांनी योगींना फटकारले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री दावोसला जात आहेत. तिथे गुंतवणुकदारांची परिषद असते. तिथे जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रोड शो करणार आहेत का? गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दावोसच्या रस्त्यावर रोड शो होणार आहे का? मग यूपीच्या मुख्यमंत्र्यांना ताजमहल हॉटेल समोर रोड शो करण्याची गरज काय? हे राजकारणाचे धंदे बंद करा, असं संजय राऊत म्हणाले.

आपण आलात तुमचा सन्मान आहे. तुम्ही सन्माने निघून जा. उद्योगपतींशी चर्चा करा. तुमच्याविषयी प्रेम आदर आहे तो राहील. फक्त राजकीय उद्योग करू नका, असं राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना सुनावले आहे.

तुम्हाला रोडशोची गरज काय? तुम्ही उद्योगपतींशी चर्चा करायला आला आहात. तुम्ही तुमच्या राज्याच्या विकासासाठी मुंबईचं योगदान घ्यायाल आला आहात तर रोड शो कशासाठी? असा सवालही त्यांनी केला.

नोएडात फिल्म इंडिस्ट्री उभारली जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. फिल्म इंडस्ट्री ही संपूर्ण देशाची आहे. दादासाहेब फाळके यांनी महाराष्ट्रात फिल्म इंडस्ट्रीची मुहूर्तमेढ रोवली. योगी मुंबईत आलेत. त्यांना कुणालाही भेटू द्या. योगींना फिल्म सिटी बनवायची असेल तर स्वागत आहे. सर्व देशातील राज्यांमध्ये फिल्म इंडस्ट्री झाली पाहिजे. दक्षिणेतही आहे.

योगींनीही करावी. स्वागत आहे. पण मुंबईतील फिल्म इंडस्ट्री अशी कोणी खेचून नेऊ शकते का? अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित हे काय गाझियाबाद, फरिदाबाद, नोएडा, कानपूर, लखनऊला उडत जाऊन राहणार आहे का? असा सवाल त्यांनी केला.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा