Sanjay Raut: भाजपचं हिंदुत्व तकलादू, त्यामुळेच नव हिंदुत्ववाद्यांच्या बुस्टर डोसची गरज; राऊतांचा हल्लाबोल

| Updated on: Apr 30, 2022 | 3:23 PM

Sanjay Raut: शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज शिवसेना भवनात बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीला संबोधित केलं.

Sanjay Raut: भाजपचं हिंदुत्व तकलादू, त्यामुळेच नव हिंदुत्ववाद्यांच्या बुस्टर डोसची गरज; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचं हिंदुत्व तकलादू, त्यामुळेच नव हिंदुत्ववाद्यांच्या बुस्टर डोसची गरज; राऊतांचा हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपच्या (bjp) उद्या होणाऱ्या सभेवर आणि भाजपच्या हिंदुत्वावर जोरदार हल्ला केला आहे. आम्हाला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कोणी घेरत नाही. हिंदुत्वावरून घेरणाऱ्यांचा घेर मोजावा लागेल. हे घेरणंबिरणं शब्द आहेत, ते शिवसेनेच्या बाबतीत ते तकलादू आहेत. हे घेरणं, कोंडी करणं वगैरे वगैरे शब्द शिवसेनेला लागू होत नाही. ते महाराष्ट्र पाहतोय उगाच प्रश्न उपस्थित करू नका, असं सांगतानाच नकली हिंदुत्ववादी, डुप्लिकेट हिंदुत्वाद्यांची चिंता करू नका. ते येतात जातात. आपल्याला राहायचं आहे. शिवसेना हिंदुत्वाची गर्जना करत राहिल आपण लढत राहू असं उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी आम्हाला सांगितलं आहे, असं संजय राऊत म्हणाले. ते बुस्टर डोस स्वत: घेतात. काही लोक स्वत:ला साप चावून घेतात. तसं ते करत आहे. त्यामुळे त्यांना बुस्टर डोसची गरज आहे. त्यांचं हिंदुत्व तकलादू असल्याने त्यांना नव हिंदुत्ववाद्यांच्या बुस्टर डोस गरज आहे. कुणी स्वत:चं मनोरंजन करत असेल तर करू द्या, असं राऊत यांनी सांगितलं.

शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज शिवसेना भवनात बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीला संबोधित केलं. त्यानंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. ही अंतर्गत बैठक होती. फटाके, बॉम्ब, दारु सामग्री हे भाषणात होतं. ते जिल्ह्यात तालुक्यात कसे फोडायचे ते पाहू. संघटना बांधणीत मागे राहू नका. हल्ल्याला प्रतिहल्ला करावाच लागेल. ढोंगाचे बुरखे फोडावेच लागेल. नकली डुप्लिकेट हिंदुत्ववादी आहेत त्यांचं आव्हान नाही, असा संदेश उद्धव ठाकरे यांनी दिला. आम्ही लढू. 14 मे रोजी बीकेसीत सभा घेणार आहोत. 8 जूनला औरंगाबादला सभा आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात फिरण्याचा संकल्प जाहीर केला आहे, असं त्यांनी सांगितलं.

लडेंगे आणि लढते रहेंगे

शिवसेना पक्षप्रमुखांनी अनेक विषयावर भाष्य केलं. पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. आक्रमपणे बोलेले. पदाधिकाऱ्यांसाठी उद्धव ठाकरेंचं वक्तव्य प्रेरणादायी आहे. पक्षाची अंतर्गत बैठक होती. त्यावर चर्चा करू नये. शिवसंपर्क मोहीम सुरू आहे. त्याबाबत मार्गदर्शन केलं आहे. लडेंगे आणि लढते रहेंगे, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

हे सुद्धा वाचा

टॉयलेट घोटाळा जगातील सर्वात मोठा घोटाळा

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी राऊतांवर अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. त्यांना केसेस टाकू द्या. अशा केसेस टाकत असाल तर सोमय्यांवर रोज 50 केसेस कराव्या लागतील. त्यांच्या नवऱ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्यांचा तिळपापड झाला. हा जगातला पहिला टॉयलेट घोटाळा आहे. त्याचा दुर्गंध कुठे सुटलाय हे दाखवू, असं ते म्हणाले.