संकटाला संधी मानत मराठी तरुणाचं पाऊल, दादरमधील घरपोच मराठमोळ्या जेवणाला शालिनी ठाकरेंचीही दाद

| Updated on: Jun 07, 2020 | 4:43 PM

कोरोनाच्या या संकटाला संधी समजून दादरमध्ये एका मराठी तरुणाने खास मराठी भोजनाची घरपोच सेवा देण्याचा व्यवसाय सुरु केला आहे (Shalini Thackeray on Wari Marathi Hotel amid Corona lockdown).

संकटाला संधी मानत मराठी तरुणाचं पाऊल, दादरमधील घरपोच मराठमोळ्या जेवणाला शालिनी ठाकरेंचीही दाद
Follow us on

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सर्वच उद्योगधंदे कोलमडले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर अनेक उद्योग तोट्यात आले आहेत. अशास्थितीत कोरोनाच्या या संकटाला संधी समजून दादरमध्ये एका मराठी तरुणाने खास मराठी भोजनाची घरपोच सेवा देण्याचा व्यवसाय सुरु केला आहे (Shalini Thackeray on Wari Marathi Hotel amid Corona lockdown). याला त्याने “वारी-तृप्त खवय्यांची” असं नाव दिलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी देखील या व्यवसायाबद्दल ट्विट करत मराठी तरुणाच्या उपक्रमास पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.

कोरोनामुळे उद्योग, कामधंदे बंद असल्याने अनेकांची अवस्था दयनीय झाली आहे. देशभरात लॉकडाऊन लावण्यात आल्यामुळे अनेक रोजगार गेले. परिणामी अनेकजण बेरोजगार झाले. अशा संकटाच्या परिस्थितीत मनसेच्या एका कार्यकर्त्याने अस्सल मराठी पिठलं भाकरीचा व्यवसाय सुरू केला आहे. तोही घरपोच सेवा देणारा. दादरमधील मनसेच्या राजगड कार्यलयात काम करणाऱ्या तुषार पाटील या तरुणाने वारी-तृप्त खवय्यांची या नावाने अस्सल मराठी भोजनाची मेजवानी आणली आहे.

मुंबईत कामाच्या निमित्ताने कोट्यावधी लोक राहतात. यातील अनेकजण जेवणासाठी ते कोणत्या ना कोणत्या हॉटेलवर अवलंबून असतात. मात्र, लॉकडाऊनमध्ये बंद पडलेले हॉटेल आणि रेस्टॉरन्ट यामुळे अनेक चाकरमान्यांचे हाल झालेले पाहायला मिळाले. यालाच संधी मानून दादरमध्ये तुषार पाटील या मराठी तरुणाने सुरु केलेल्या या उपक्रमाला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तुषारने दादर परिसरात घरपोच सुविधा देणारा मराठमोळा ब्रँड तयार केल्यावर मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनीही या तरुणाचं ट्विटरद्वारे कौतुक केलं.


शालिनी ठाकरे म्हणाल्या, “संकटातील संधी. ‘राजगड’ कार्यालयातील आमचा सहकारी तुषार पाटील याने पिठलं – भाकरी, ठेचा व वांग्याचे भरीत असा मराठमोळा मेनू घरपोच देण्याचा व्यवसाय आजपासून सुरु केला आहे. एका मराठी तरुणाच्या या उपक्रमास आपण सर्वांनी पाठिंबा देऊन त्याचे मनोबल वाढवूया. मनःपूर्वक शुभेच्छा!”

हेही वाचा :

‘आध्यात्मिक पुस्तकं वाचा, मन:शांती लाभेल’, हसन मुश्रीफांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला

मान्सून सुरु होण्यापूर्वी तरी मदत द्या, गुहागरमधील कोळी बांधव-बागायतदार रडकुंडीला

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीसाठी गुडन्यूज, रुग्णवाढीच्या वेगात कमालीची घट

Shalini Thackeray on Wari Marathi Hotel amid Corona lockdown